भातखळकर… उगीच नाकाने कांदे कशाला सोलता, तुमचेच वांधे होतील: रोहित पवार

वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत, असे भातखळकर यांनी म्हटले होते. | Rohit Pawar atul bhatkhalkar

भातखळकर... उगीच नाकाने कांदे कशाला सोलता, तुमचेच वांधे होतील: रोहित पवार
रोहित पवार आणि अतुल भातखळकर
| Updated on: May 26, 2021 | 3:50 PM

मुंबई: कोविड सेंटरमध्ये नाचल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना भाजपच्या नेत्यांकडून लक्ष्य केले जात आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत, असे बोलत रोहित पवार (Rohit Pawar) यांना धारेवर धरले होते. (NCP leader Rohit Pawar hits back bjp leader atul bhatkhalkar)

त्यानंतर रोहित पवार यांनी अतुल भातखळकर यांना चोख भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचा कोरोना लस घेतानाचा फोटो ट्विट केला आहे. 45 वर्षांखालील नागरिकांना कोरोना लस घेण्याची परवानगी नसताना तन्मय फडणवीस याने लस टोचून घेतली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि पर्यायाने भाजप अडचणीत आला होता. याच मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी अतुल भातखळकर यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

नियमांची गोष्ट कोण करतंय? भातखळकरजी आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा आधी. उगीच कशाला नेहमीच नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करता? यामुळं स्वतःचेच जास्त वांधे होतील, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.

अतुल भातखळकर काय म्हणाले होते?

कोविड रुग्णांना नातेवाईकांची भेट घेण्याची परवानगी नाही आणि कोविड सेंटरमध्ये रोहित पवार यांना नाचायची परवानगी आहे? वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत.

संबंधित बातम्या : 

कोविड सेंटरमधील ‘झिंगाट’ डान्सवरुन रोहित पवार आणि दरेकरांमध्ये ट्विटर वॉर!

कोविड सेंटरमधील ‘झिंगाट’ डान्सवरुन दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

कोरोनाग्रस्तांसोबत रोहित पवारांचा डान्स, दरेकर म्हणतात पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

(NCP leader Rohit Pawar hits back bjp leader atul bhatkhalkar)