कोविड सेंटरमधील ‘झिंगाट’ डान्सवरुन रोहित पवार आणि दरेकरांमध्ये ट्विटर वॉर!

रोहित पवारांना नियमांची आठवण करुन देत पवारांचे नातू म्हणून वेगळा न्याय का? असा सवाल केला. त्यावरुन या दोघांमध्ये आता शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.

कोविड सेंटरमधील 'झिंगाट' डान्सवरुन रोहित पवार आणि दरेकरांमध्ये ट्विटर वॉर!
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 8:45 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार रोहित पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यात जोरदार ट्विटर वॉर पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गायकरवाडी इथल्या कोविड सेंटरमध्ये रोहित पवार यांनी कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरला. रोहित पवारांच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कोरोना रुग्णांसोबतच्या डान्सवरुन प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांना नियमांची आठवण करुन देत पवारांचे नातू म्हणून वेगळा न्याय का? असा सवाल केला. त्यावरुन या दोघांमध्ये आता शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. (Twitter war between Praveen Darekar and Rohit Pawar after Rohit Pawar’s dance)

“रोहित पवार यांनी एका कोव्हिड सेंटरवर जाऊन कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग केला, तो निषेधार्ह आहे. कोणतंही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरु शकतात. सर्व सामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का, असा प्रश्न निर्माण होतो. कुणीही लोक प्रतिनिधी असो, त्यांनी गांभीर्याने या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले होते.

दरेकरांना रोहित पवारांचं उत्तर

दरेकरांच्या टीकेला उत्तर देताना “सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब कोविड सेंटरमधली माणसं माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे. त्यामुळं शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच भेटतो. माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे,” असं रोहित पवार म्हणाले.

त्याचबरोबर “५ वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखं मी रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही. तसंच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेंव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचंही काही दिसलं नाही! असं का?”, असा सवालही रोहित पवार यांनी दरेकरांना विचारलाय.

रोहित पवारांच्या उत्तरावर दरेकरांचा पलटवार

“रोहित पवारजी, मतदारसंघातील सर्वांना कुटुंब समजून आपण त्यांची सेवा करता,हे उत्तमच!त्याविषयी आक्षेप किंवा शंका नाही. पण राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी,अधिकारी रुग्णांची जमेलतशी सेवा करीत आहेतच. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणं,ही तुमच्या माझ्यासारख्यांसाठी आनंदाची पर्वणीच ठरेल. पाचवी नापास झालेल्या गुजरातमधील आमदारांसारखे आपण इंजेक्शन दिले नसेलही, पण कोविड नियमांचे केलेले उल्लंघन ही त्याच तोडीची गंभीर बाब आहे.”

“नियम उल्लंघनाबाबत आमच्या पक्षातील असो व अन्य, मी त्या त्यावेळी माझी भूमिका मांडली, समर्थन केले नाही. गुजरातमधील आमदारांकडे बोट करताना अनेक मंत्री खुलेआम प्रोटोकॉलचे उल्लंघन करत होते, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवीत होते, लग्न समारंभांना उपस्थित रहात होते,दस्तुरखुद्द बारामतीत पाणी भरून इंजेक्शन विकली जात होती,काँग्रेसचे तर मेळावे होत होते, त्याबद्दल आपण भूमिका मांडल्याचे आठवत नाही”, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावलाय.

‘रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करू, पण नियमांचे पालन करूनच!’

त्याचबरोबर, “जे चूक, ते चूकच असते. मग तो कोणीही असो! दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपल्याकडे चार बोटे असतात, एव्हढेच ‘रोहित’ जी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आपल्या चांगल्या कामाबद्दल कौतुकच आहे. पण, नियम हा सर्वांसाठी सारखाच असतो. मग तो तुमच्या पक्षाचा नेता असो वा अन्य कोणत्या! रोहित जी, तुम्ही, आम्ही, सारे मिळून या संकटात सदा सर्वकाळ सर्व रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करूया, परंतु नियमांचे पालन करूनच!”, असं ट्वीट करुन दरेकरांनी कोरोना नियमांवर बोट ठेवलंय.

संबंधित बातम्या : 

कोविड सेंटरमधील ‘झिंगाट’ डान्सवरुन दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

कोरोनाग्रस्तांसोबत रोहित पवारांचा डान्स, दरेकर म्हणतात पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

Twitter war between Praveen Darekar and Rohit Pawar after Rohit Pawar’s dance

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.