राज्यपाल पद सोडून आधी महाराष्ट्राबाहेर जावं, शिवरायांच्या वक्तव्यावरून या नेत्याची आक्रमक टीका

| Updated on: Nov 30, 2022 | 10:53 PM

या वादग्रस्त वक्तव्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेची एकच इच्छा आहे. ती म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा

राज्यपाल पद सोडून आधी महाराष्ट्राबाहेर जावं, शिवरायांच्या वक्तव्यावरून या नेत्याची आक्रमक टीका
Follow us on

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त बोलणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात लोकांच्या मनात राग असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी नेहमी अपमानजनक बोलणाऱ्या राज्यपालांनी राजीनामा देऊन त्यांनी महाराष्ट्रातून बाहेर जावं अशी खरमरीत टीकाही त्यांच्यावर त्यांनी केली.

भाजपकडून आणि त्यांच्या अनेक नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य केले जाते. त्यामुळे लोकांच्या भावना दुखवल्या आहेत.

त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेची एकच इच्छा आहे. ती म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रातून बाहेर जावं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकद नाही अशी चूक त्यांनी दुसऱ्यांदा केली आहे. त्यामुळे येथील जनता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असंही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

महापुरुषांबद्दल तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत असाल तर त्याला राज्यातून हा विरोध होणारच असंही रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

राज्यपालांनी महापुरुषांबद्दल केलेलं वक्तव्य हे एकदा नाही तर दोनदा केलं आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्र अजिबात खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

महाराष्ट्रात राज्यपालांना होणारा विरोध हा एका व्यक्तीचा नाही तर तो येथील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राबाहेर जावं अशी इच्छा येथील जनतेची असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.