AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालना बलात्कार : पोलिसांचा पीडितांवरच दबाव, SIT नेमून प्रकरणाची चौकशी करा : राष्ट्रवादी

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात आज मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा (NCP Morcha against Jalna gangrape ) काढण्यात आला.

जालना बलात्कार : पोलिसांचा पीडितांवरच दबाव, SIT नेमून प्रकरणाची चौकशी करा : राष्ट्रवादी
| Updated on: Aug 30, 2019 | 3:30 PM
Share

Jalna Girl gang rape मुंबई : जालन्यातील बलात्कार (Jalna Girl gang rape) पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात आज मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा (NCP Morcha against Jalna gangrape ) काढण्यात आला. स्वत: सुप्रिया सुळे मोर्चाचे नेतृत्त्व करत असल्याने पोलीस यंत्रणाही खडबडून जाग्या झाल्या आहेत.

 कायदे कडक करुन उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी कोण करणार, असा सवाल सुप्रिया सुळेंनी यावेळी विचारला.  

चेंबूर येथे झालेल्या बलात्कारप्रकरणी दीड महिना उलटून गेला तरी अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत. या प्रकरणी एसआयटी नेमून चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली.

संशयित आरोपींबाबत पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. उलट, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांवर पोलिसांकडून दवाब टाकण्यात येतोय. त्यामुळे हे प्रकरण जाणीवपूर्वक दाबण्याचे काम पोलिसांकडून होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला.

जालन्यातील बलात्कार (Jalna Girl gang rape) पीडित तरुणीच्या मृत्यूनंतरही चार आरोपी नराधम अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) त्यांचा अद्याप शोध घेता आलेला नाही. 7 जुलैला मुंबईत झालेल्या (Jalna Girl gang rape)सामूहिक बलात्कारानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या जालन्यातील तरुणीने औरंगाबादमधील (GHATI) रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान 28 ऑगस्टला रात्री तिचं निधन झालं.

दरम्यान, आरोपीला पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कुटुंबाने घेतला आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पीडित कुटुंबाने घेतली आहे. 36 तास उलटले तरी मृतदेह ताब्यात घेतला नाही.

मुख्यमंत्र्यांवर सुप्रियांचा निशाणा

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाजनादेश यात्रेत (MahaJanadesh Yatra) गुंग आहेत. त्यांनी काल जालन्यात असूनही या बलात्कार पीडितेविषयी एक शब्दही काढला नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.

“दिल्लीतील निर्भयाप्रमाणेच ही घटना आहे. मात्र, आरोपी अजूनही फरार आहेत. चुनाभट्टी पोलीस आरोपीला पकडण्यात अपयशी आहेत. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांनी देखील गैरवर्तन केले आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस याविरोधात चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार आहे”, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

जालन्यातील 19 वर्षीय पीडित तरुणीची जवळपास दीड महिने मृत्यूशी झुंज सुरु होती. तिच्यावर औरंगाबादेत उपचार सुरु होते.

महिला आयोगाकडून दखल

दरम्यान, मुंबईमध्ये सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या मूळच्या जालना येथील तरूणीच्या मृत्यूप्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल द्या आणि आरोपींना तातडीने अटक करा, अशा सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत.

संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम

  • मुलीचा मृत्यू – 28 ऑगस्ट रात्री 9 वाजता
  • घटना घडली – 7 जुलै, रात्री 10 वाजता घरी आल्यानंतर कुटुंबाला प्रकार समजला
  • गुन्हा दाखल तारीख :- 29 जुलै, वडिलांच्या तक्रारीवरून दाखल – बेगमपुरा पोलीस ठाणे औरंगाबाद
  • दाखल गुन्हा, 30 तारखेला मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
  • सध्या तपास थंड गतीने सुरू आहे. अद्याप आरोपी पकडले नसल्याची पोलिसांची माहिती.
  • औरंगाबाद पोलिसांनी चुनाभट्टी पोलिसात गुन्हा वर्ग केल्यानंतर कुठलाही तपास केला नाही
    • मुंबई पोलिसांची आताची भूमिका ही फक्त आमचा तपास सुरू आहे. इतकीच प्रतिक्रिया मिळत आहे.

संबंधित बातम्या 

मुंबईत सामूहिक बलात्कार झालेल्या जालन्याच्या तरुणीचा अखेर मृत्यू   

आरोपीची माहिती दिली, पोलिसांनी बलात्कार झालाय हेच मान्य केलं नाही : पीडितेचा भाऊ   

जालन्यातील मुलीवर चुनाभट्टीत गँगरेप, दीड महिन्यांपासून मुंबई पोलिसांना नराधम सापडेना 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.