ब्रिटनमधून आलेल्या 8 प्रवाशांना नव्या कोरोनाची लक्षणे, राजेश टोपेंच्या माहितीने धाकधूक

| Updated on: Jan 04, 2021 | 7:31 PM

त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली आहे. (New Corona Virus Strain Patient Found In Maharashtra) 

ब्रिटनमधून आलेल्या 8 प्रवाशांना नव्या कोरोनाची लक्षणे, राजेश टोपेंच्या माहितीने धाकधूक
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनने अखेर महाराष्ट्रात एंट्री केली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली आहे. (New Corona Virus Strain Patient Found In Maharashtra)

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतंच ब्रिटनमधून परतलेल्या आठ प्रवाशांना नव्या कोरोनाची लक्षण आढळली होती. यातील पाच जण हे मुंबईतील आहेत. तर पुणे, ठाणे, मिरा-भाईंदर या ठिकाणाचे प्रत्येकी एक प्रवाशी आहेत. या सर्व प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे.

दरम्यान आज राज्यात 3 हजार 282 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने राज्यात  2064 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.59 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यूदर 2.56 टक्के इतकी आहे. (New Corona Virus Strain Patient Found In Maharashtra)

ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणुमुळे राज्यात अधिक दक्षता जात आहे. तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले.

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले.

ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते मात्र. गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. (New Corona Virus Strain Patient Found In Maharashtra)

संबंधित बातम्या : 

मुंबईकरांना दिलासा, मार्चनंतर प्रथमच सर्वात कमी मृत्यूची नोंद

परवानगीनंतर मुंबईतील 4 रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होणार