AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात”

निलेश राणे यांनी ट्विट करुन शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील भेटीवर प्रश्न चिन्ह उभं केले आहे. (Nilesh Rane Vishwas Nangare Patil)

मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात
विश्वास नांगरे पाटील निलेश राणे
| Updated on: Jan 15, 2021 | 11:39 AM
Share

मुंबई: भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली यावर आक्षेप नोंदवला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करुन शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील भेटीवर प्रश्न चिन्ह उभं केले आहे. (Nilesh Rane raised question over meeting of Sharad Pawar and Vishwas Nangare Patil in Dhananjay Munde Case)

निलेश राणे काय म्हणाले?

शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटीवर निलेश राणेंनी ट्विट करुन प्रश्न विचारले आहेत. “काय चाललंय महाराष्ट्रात??? मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी?? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं.”

निलेश राणेंनी विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित मुंबईचे सहपोलीस आयुक्त बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला त्यांच्या घरी कसे भेटू शकतात, हा प्रश्न विचारला. हा प्रकार केस झाकण्यासाठीचा अजेंडा दिसतो, अशा घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडेल, असंही निलेश राणे म्हणाले. सामान्य नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे का?, असा सवालही ही निलेश राणेंनी उपस्थित केला.

विश्वास नांगरे पाटील शरद पवार सिल्वर ओकवर भेट

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील थेट पवारांच्या भेटीला 14 जानेवारीला सायंकाळी पोहोचले होते. सिल्व्हर ओकवर विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांशी चर्चा केली. धनंजय मुंडेंवरच्या आरोपांनंतर थेट विश्वास नांगरे-पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विश्वास नांगरे-पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचीत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोणतंही कठीण प्रकरण सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे विश्वास नांगरे या प्रकरणाची गुंतागुंत कशी सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पवारांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट दिल्यानंतर आता विश्वास नांगरे पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत. पवारांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय. विश्वास नांगरे पाटलांनी सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

संबंधित बातम्या

धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार की राहणार?, राष्ट्रवादीच्या उद्याच्या बैठकीत ठरणार

मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल, कृष्णा हेगडेंनी वात पेटवली

(Nilesh Rane raised question over meeting of Sharad Pawar and Vishwas Nangare Patil in Dhananjay Munde Case)

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.