Lockdown : एकाचवेळी लाईट बंद केल्यास ग्रीडमध्ये बिघाडाची शक्यता : ऊर्जामंत्री राऊत

| Updated on: Apr 03, 2020 | 10:36 PM

ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Lockdown : एकाचवेळी लाईट बंद केल्यास ग्रीडमध्ये बिघाडाची शक्यता : ऊर्जामंत्री राऊत
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी येत्या रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता (Nitin Raut Reaction On Modi) आपआपल्या घरातील लाईट बंद करुन 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे 9 मिनिटे एकाचवेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक (Nitin Raut Reaction On Modi) बिघाड होऊन संपूर्ण राज्य आणि देश अंधारात जाण्याचा धोका उद्भवू शकतो.

संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या राज्यात, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र या सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच जनतेनेही आवश्यक तितकेच लाईट चालू ठेऊन, दिवे, मेणबत्ती लावावेत असे आवाहन ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे.

जर देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होऊ शकते. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्यामुळे वीज उत्पादन आणि पुरवठ्याचे गणित बदलले आहे. जर सर्वांनी एकाचवेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ग्रीडमध्ये बिघाडाची शक्यता

ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जनतेने काळजीपूर्वक विचार करावा आणि आवश्यक तितके लाईट चालू ठेऊन, दिवे किंवा मेणबत्ती लावावी, असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.

सध्यस्थितीत महाराष्ट्र राज्याची पॉवर डिमांड ही 23 हजार मेगावॅटवरुन 13 हजार मेगावॅटवर आली आहे. लॉकडाऊनमुळे इंडस्ट्री लोड पूर्णतः झिरो झाले आहे. 13 हजार मेगावॅट विजेवर केवळ अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे. सर्वांनी अचानक दिवे बंद केल्यास सर्व पावरस्टेशन (Nitin Raut Reaction On Modi) हायफ्रिक्वेन्सीवर जाऊ शकतात. परिणामी आपल्या ग्रीडमध्ये अनावश्यक फीडर ट्रीपिंग्स येऊ शकतात.

मोठ्या प्रमाणात पावर डिमांड असलेल्या महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात वीज फेल्युरमुळे परिणामी सर्व पावर स्टेशन बंद पडल्यास “मल्टी स्टेट ग्रीड फेल्युर” होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, एक पावर स्टेशन सर्व्हिसमध्ये यायला साधारणतः 12-16 तास लागू शकतात.

कोरोना विरुद्ध युद्धासाठी या देशातील वीज ही सर्वांत महत्त्वाची घटक आहे. त्यामुळे विजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा, असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे (Nitin Raut Reaction On Modi).