तुम्ही गृहमंत्री होणार का?; जयंत पाटील म्हणतात, या बाजारातल्या गप्पा!

सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोर बैठका सुरू आहेत. (no discussion to change maharashtra home minister in meeting, says jayant patil)

तुम्ही गृहमंत्री होणार का?; जयंत पाटील म्हणतात, या बाजारातल्या गप्पा!
jayant patil
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 1:29 PM

मुंबई: सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोर बैठका सुरू आहेत. अनिल देशमुख यांना हटवून जयंत पाटील यांच्याकडे गृहखातं देण्यात येणार असल्याच्या जोरदार चर्चाही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता, या बाजारातल्या गप्पा असल्याचं सांगत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं. (no discussion to change maharashtra home minister in meeting, says jayant patil)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांना मीडियाशी संवाद साधला. यावेळी तुम्ही गृहमंत्री होणार असल्याच्या चर्चा असल्याचं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा, या बाजारातल्या गप्पा आहेत. अशा चर्चांवर विश्वास ठेवू नका, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच आमदारांच्या मतदारसंघातील कामं आणि आमदार निधींबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. इतर विषयांवर चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मला माहीत नाही

गेल्या तीन दिवसांपासून गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. या बैठकीत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बदलण्यात येणार असल्याची चर्चा झाल्याचं समजतं. त्याबद्दल काय सांगाल, असं पाटील यांना विचारण्यात आलं. तेव्हा, या बैठकांना मी उपस्थित नव्हतो. त्यामुळे मला माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मतभेद नाहीत

शिवसेनेची गृहखात्यात ढवळाढवळ वाढल्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. अनिल परब हे गृहखात्यात ढवळाढवळ करत असल्याने शरद पवार नाराज आहेत अशी चर्चा आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा अशी बातमी माझ्यापर्यंत आली नाही. गृहमंत्र्यांनी अशी तक्रार केलेली आहे, याची मला माहिती नाही, असं पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकत्रित काम करत आहेत. काहीच मतभेद नाहीत. प्रशासकीय बदल्यांचे निर्णय दोन्ही नेते घेत असतात. प्रशासकीय कामाबाबत नाराजी असण्याचं कारण नाही, असंही त्यांनी सांगितलं.

जावडेकरांना टोला

यावेळी कोरोना लसीकरणावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. कोरोना लसीकरणाचा आकडा माझ्याकडे नाही. आरोग्य मंत्रीच त्याबाबत अधिक माहिती देऊ शकतील. परंतु, भारतीने तयार केलेली ही लस आहे. असं असतानाही ज्यांनी भाजपला निवडून दिलं त्या भारतीयांचं लसीकरण करण्यात आपण स्लो आहोत. परदेशात आपण लस पाठवतो. पाकिस्तानसह परदेशात लस पोहोचवली जात आहे. पाकिस्तानला लस देत असल्याबाबत केंद्र सरकारच्या दानशूरपणाचं कौतुकच आहे. भारतीय लोक लसीकरणात मागे राहिले तरी चालेल, अशीच केंद्राची मानसिकता दिसत आहे, असं सांगतानाच भारतीयांची काळजी घेण्याऐवजी पाकिस्तानी जनतेची काळजी का? याचं आधी उत्तर जावडेकरांनी दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले. (no discussion to change maharashtra home minister in meeting, says jayant patil)

संबंधित बातम्या:

54 लाख लस दिल्या, मग आतापर्यंत 23 लाख लसच का टोचल्या?; लसीकरणावरून जावडेकरांचा महाराष्ट्र सरकारला ‘डोस’

Video: दिलीप गांधी गेले अन् लोकांना अचानक ‘ते’ भाषण आठवले; काय कंठ दाटला होता गांधींचा, पाहा व्हिडीओ

अनिल परबांचा गृहखात्यात हस्तक्षेप, देशमुखांची थेट तक्रार, शरद पवारांकडून उघड नाराजी

(no discussion to change maharashtra home minister in meeting, says jayant patil)

Non Stop LIVE Update
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.