कचरामुक्त मुंबई मोहिमेवरून श्रेयवादाचं राजकारण, महापौरांसह शिवसेनेच्या नेत्यांना आमंत्रणच नाही

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरामुक्त मुंबई मोहिमेवरुन मुंबईत श्रेय घेण्यावरुन राजकारण सुरु झाले आहे. या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना निमंत्रण पत्रिकेवरुन डावलण्यात आले आहे.

कचरामुक्त मुंबई मोहिमेवरून श्रेयवादाचं राजकारण, महापौरांसह शिवसेनेच्या नेत्यांना आमंत्रणच नाही


मुंबई: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरामुक्त मुंबई मोहिमेवरुन मुंबईत श्रेय घेण्यावरुन राजकारण सुरु झाले आहे. या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. विशेष मात्र, या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वेशर महाडेश्वर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांना निमंत्रण पत्रिकेवर स्थान देणे टाळले आहे.

कचरामुक्त मुंबई मोहिमेत मुंबई महापालिकेचाही महत्वाचा सहभाग आहे. मुंबई पोलिस दल आणि मुंबई महापालिका संयुक्तपणे ही मोहिम राबवणार आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची निमंत्रण पत्रिकेवर नावे टाकण्यात आली. यावेळी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि दीपक केसरकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र, निमंत्रण पत्रिकेत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर महाडेश्वर यांनाच डावलण्यात आले. तसेच शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले नाही.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी महापौर महाडेश्वर यांना फोन करून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र, अपमानास्पद वागणूक मिळाल्याने महापौर कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI