मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनार्थ अनेक याचिका दाखल

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका आणि मध्यस्थ याचिका दाखल झाल्या आहेत. हायकोर्टातील दिग्गज वकील यासाठी युक्तिवाद करत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मग त्याविरोधातील पहिली याचिका अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली. त्यांनी मराठा आरक्षण रद्द करावं अशी थेट मागणी केली. यानंतर लगेचच मराठा आरक्षणाला विरोध करणारी दुसरी […]

मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनार्थ अनेक याचिका दाखल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका आणि मध्यस्थ याचिका दाखल झाल्या आहेत. हायकोर्टातील दिग्गज वकील यासाठी युक्तिवाद करत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मग त्याविरोधातील पहिली याचिका अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली. त्यांनी मराठा आरक्षण रद्द करावं अशी थेट मागणी केली. यानंतर लगेचच मराठा आरक्षणाला विरोध करणारी दुसरी याचिका युथ फॉर इक्वॅलिटी या संघटनेने केली. त्यांचीही तिच मागणी होती. याशिवाय आणखी एक याचिका मराठा आरक्षणविरोधात आहे.

याशिवाय एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांची याचिका. या याचिकेत जर मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल तर मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जलील यांनी त्यांची याचिका मागे घेतली आहे.

दुसरीकडे मात्र, गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेला विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 1 जनहित याचिका दाखल आहे. ही याचिका विनोद पाटील यांनी दाखल केली आहे. तर इतर सुमारे 28 जणांनी इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केल्या आहेत. एखाद्या प्रकरणात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झाल्या आहेत.

कोण-कोण आहेत याचिकाकर्ते?

आनंद राव काटे

अखिल भारतीय मराठा महासंघ

विलास सुद्रीक

अशोक पाटील

डॉ कांचन पतीलव

सुभाष बाळू सालेकर

पांडुरंग शेलकर

नितेश नारायण राणे

लक्ष्मण मिसाळ

प्रवीण निकम

विपुल माने

विनोद पोखरकर

दिलीप पाटील

संदीप पोळ

विवेक कुराडे

विनोद साबळे

कृष्णा नाईक

अंकुश कदम

संतोष राईजाधव

बाळासाहेब सराटे

अखिल मराठा फेडरेशन

विक्रम शेळके

विठ्ठल घुमडे

सुरेश आंबोरे

राजेंद्र कोंढारे

हे सर्व मराठा आरक्षण समर्थक आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झाल्याने मग त्यासाठी वकिलांची फौज आलीच. मराठा आरक्षणावर जेव्हा सुनावणी सुरू होते त्यावेळी सुनावणीवसाठी सुमारे 40-50 वकील उभे राहतात.

या सुनावणीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक आजी-माजी अॅडव्होकेट जनरल उभे राहतात. अॅड. जनरल आशुतोष कुंभकोनी हे सरकारचे वकील आहेत. तर विजय थोरात हे माजी अॅडव्होकेट हे देखील सरकारचे विशेष वकील आहेत. आणखी एक माजी अॅडव्होकेट जनरल रवी कदम हे देखील मराठा आरक्षणाची बाजू मांडत आहेत. माजी अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. ते युथ फॉर इक्वॅलिटीची बाजू मांडत आहेत.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.