AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या घडामोडींना वेग… छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेते एकवटले; काय निर्णय होणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. जरांगे यांची सग्यासोयऱ्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. सरकारने तसं नोटिफिकेशन्स काढलं आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या आरक्षणावर गदा आल्याची भावना ओबीसी समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक होत आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ही बैठक बोलावली आहे.

मोठ्या घडामोडींना वेग... छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेते एकवटले; काय निर्णय होणार?
chhagan bhujbal Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 28, 2024 | 6:09 PM
Share

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 28 जानेवारी 2024 : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत नोटिफिकेशन्स काढल्याने राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार असल्याने छगन भुजबळ यांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ओबीसी आणि इतर समाजातील नेते भुजबळ यांच्या निवासस्थानी जमले आहेत. ओबीसी नेते यावेळी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. भाजप आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, समीर भुजबळ, लक्ष्मण हाके, नाना शितोळे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे बैठकीला उपस्थित झाले आहेत. तसेच ओबीसी समाजातील महत्त्वाचे प्रतिनिधी सुद्धा बैठकीला उपस्थित झाले आहेत. ओबीसी नेत्यांसह सर्व मागासवर्ग समाजाच्या नेत्यांसोबतही चर्चा करण्यात येणार आहेत.

काय निर्णय होणार?

मराठा आरक्षण अध्यादेशाच्या मसुद्यावर ओबीसीसह इतर समाजातील बांधवांनी 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवण्यावर बैठकीत चर्चा होणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी बॅक डोअर एन्ट्री देण्यात आली आहे. ओबीसींना आरक्षणातून धक्का मारून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. त्यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. घरांची जाळपोळ आणि पोलिसांवरील हल्ले आदी प्रकरणी गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर देखील चर्चेची शक्यता आहे. तसेच आजच्या बैठकीत काही ठोस कृती कार्यक्रम ठरण्याची शक्यता असल्याने छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी सुरू झालेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रात्र वैऱ्याची आहे… तातडीने पावलं उचला!

दरम्यान, सरकारच्या निर्णयानंतर आता सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होताना दिसत आहे. ओबीसी बांधवांनो आपल्या सर्वांसाठी रात्र वैऱ्याची आहे. आपल्यावर आलेल्या या झुंडशाहीच्या संकटाला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला तातडीने कायदेशीर मार्गाने प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. छगन भुजबळांनी केलेल्या आवाहनानुसार ओबीसी समाजातील प्राध्यापक, वकील, शिक्षक यांच्यासह इतर सर्व सुशिक्षित बांधवांनी तातडीने आपल्या हरकती नोंदवा, असं आवाहन करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर हा मेसेज तुफान व्हायरल होत आहे.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.