कोरोनाचा विळखा वाढला, मुंबई पोलीस दलातील आणखी एका हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू

| Updated on: Apr 26, 2020 | 1:08 PM

मुंबई पोलीस (Mumbai Police Constable Corona Death) दलात कार्यरत असलेल्या एका 52 वर्षीय पोलीस हवालदाराचा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा विळखा वाढला, मुंबई पोलीस दलातील आणखी एका हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला (Mumbai Police Constable Corona Death) आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या आणखी एका 52 वर्षीय पोलीस हवालदाराचा आज (26 एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस हे मुंबईतील पोलीस दलात कार्यरत होते. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसात दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस (Mumbai Police Constable Corona Death) दलात कार्यरत असलेल्या एका 52 वर्षीय पोलीस हवालदाराचा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला आहे.

काल (25 एप्रिल) मुंबईत एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी इथला रहिवासी होता.

तर दुसरीकडे धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इन्सपेक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी शाहू नगर पोलीस ठाण्यातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

राज्यात 96 पोलिसांना कोरोना

दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत 96 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 96 पोलिसांत 15 अधिकाऱ्यांचा आणि 81 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली.

वर्षा बंगल्यावरील महिला पोलिसाला कोरोना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं मागील आठवड्यात समोर आलं होतं.

संबंधित बातम्या : 

मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाचा वाढता कहर

‘मातोश्री’च्या अंगणातील चहावाल्याची कोरोनावर मात, ठाकरे परिवाराचे आभार