AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लढाईला मजा येते”; ठाकरे गटाच्या नेत्यानं कार्यकर्त्यांना बळ दिलं, अन् शिवसेनेला सुनावलं…

सध्याच्या काळात शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली

लढाईला मजा येते; ठाकरे गटाच्या नेत्यानं कार्यकर्त्यांना बळ दिलं, अन् शिवसेनेला सुनावलं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 01, 2023 | 12:43 AM
Share

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तानाजी आणि बाजीप्रभू हे शेवटपर्यंत लढत होते. त्यांच्यासारख्या सैनिकांप्रमाणे आपल्यालाही लढाई करायची आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लढा हा चालूच राहणार असल्याने त्यासाठी आपली संघटना मजबूत करा असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. शिवगर्जना यात्रे प्रसंगी ते बोलत असताना त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देश्यून भाषण केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरही जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे विरोधी गटातील ठाकरे गटाची राज्यातील वेगवेगळ्या भागात शिवगर्जना यात्रा जोरदारपणे सुरु आहे. त्यामुळे शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने ठाकरेगटातील नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी राज्यातील महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भावही मिळत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे. शेतीमालाा योग्य भाव मिळत नसल्याने शेतीमालावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरं सोडून पीक जनावरांच्या स्वाधीन केले आहे.

सध्याच्या काळात शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

पण त्याचवेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना आवाहन करताना येणाऱ्या काळात आपली ही संघटना आणखी मजबूत होईल आणि ती कशी करता येईल याकडे लक्ष द्या असं आवाहन त्यांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना केले आहे.

येणाऱ्या काळात लढई मोठी करावी लागणार आहे. कार्यकर्त्यांना उद्देश्यून ते म्हणाले की, एकदा हा लढा जिंका, कारण आता लढाईला खरी मजा येते असल्याचे सांगत येणाऱ्या काळात लढा मजबूत करा आणि संघटनाही मजबूत करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?