पंडित नेहरुंचा आरक्षणाला विरोध होतो… उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा दावा
jagdish dhankar: देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी आरक्षणाला विरोध केला होता. मी पुन्हा सांगतोय आपल्या पहिल्या पंतप्रधानांनी सांगितले होते की मी आरक्षण लागू होऊ देणार नाही. नोकऱ्यामध्ये आरक्षण त्यांना नको होते, असा दावा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केला आहे
देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी आरक्षणाला विरोध केला होता. मी पुन्हा सांगतोय आपल्या पहिल्या पंतप्रधानांनी सांगितले होते की मी आरक्षण लागू होऊ देणार नाही. नोकऱ्यांमध्ये आरक्षण त्यांना नको होते, असा दावा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केला आहे. तसेच बाबासाहेब आंबडेकर यांना भारत रत्न उशिरा दिले गेल्याचे त्यांनी सांगितले. जगदीश धनखड यांच्या या वक्तव्यांवरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.
संविधानातील काळा दिवस
आपल्या इतिहासातील काळा दिवस आणीबाणी लावलेला १९७५ सालचा तो दिवस आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी एक हुकूम जारी केला होता. त्यानंतर हजारो लोकांना जेलमध्ये टाकले होते. हुकुमशाही काय होती, ते त्या काळात दिसली.लोकशाही कुठेच जीवंत नव्हती. त्यांनी बाबासाहेबांचे संविधानाची हत्या केली होती. फक्त खुर्ची वाचवण्यासाठी अर्ध्या रात्री संविधानावर घात करून आणीबाणी लागू केली होती.
त्या दिवशीच गॅझेट
आपण लोकशाही दिन का साजरा करतो? तर आपल्या संविधानाची निर्मिती कशी झाली आहे, ते कसे आपल्याला बळ देते. हे समजण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. आपले राष्ट्रपती अशी व्यक्ती आहे ज्यांनी सर्व संघर्ष केला आहे. आपले पंतप्रधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन मुंबईत करत होते. त्यावेळी त्यांच्या मनात आले की संविधान दिवस साजरा करायला हवा. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांनी गॅजेट प्रकाशित केले. त्या दिवशी आणीबाणी लागू केलेल्या व्यक्तीचा वाढदिवस होता. त्यांनी मुलभूत अधिकारावर गदा आणली अशा काळ्या दिवसाच्या दिनीच एक किरण दाखवणारा निर्णय घेतला. यापेक्षा योगायोग काय असावा, असे उपराष्ट्रपतींनी म्हटले.
संविधानाबाबत मंगलप्रभात लोढांपेक्षा कुणी जाणू शकतो. त्यासाठी मंगलप्रभात लोढा यांचे वडील जेलमध्ये गेले होते. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली होती. त्यांचे निमंत्रण आले तेव्हा मला आनंद झाला. १४० कोटी जनतेला सांगता येईल की आपले खरे मंदिर हे संविधान आहे. मंगलजी तुम्ही मंगल काम केले आहे. लोकशाही दिनानिमित्त केलेल्या या कामाचा परिणाम जगभरात पडेल. आज या उपक्रमाची गरज आहे. काही लोक संविधानाचा आत्मा विसरले आहेत. या उपक्रमात सातत्य राहिले पाहिजे. हे नक्कीच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे.