Mumbai Local : पनवेल ते कर्जत मार्गीकेचं काम वेगात, कर्जतहून मुंबईला पोहचा पावणेदोन तासांत

| Updated on: Jun 16, 2022 | 12:41 PM

नवा प्रस्तावित पनवेल-कर्जत मार्ग सध्याच्या मार्गाला जवळपास समांतर बांधण्यात येत आहे. सध्याच्या मार्गावर दोन बोगदचे आहेत.

Mumbai Local : पनवेल ते कर्जत मार्गीकेचं काम वेगात, कर्जतहून मुंबईला पोहचा पावणेदोन तासांत
लोकल
Follow us on

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता सीएसएमटी (CSMT) व्हाया पनवेल (Panvel) असा पर्यायी मार्ग वेगानं तयार होत असल्यानं मुंबईकरांच्या प्रवासाची 25 ते 30 मिनिटांची बचत होणार आहे. बचत यासाठीच की मुंबईकरांना मिनिटांचेचं का तर प्रत्येक सेकंदाचंही महत्व असतं. मुंबईकर कोणताही वेळ कधीच वाया जावू देत नाही. अशातच सीएसएमटी व्हाया पनवेल असा पर्यायी मार्ग झाल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पनवेल आणि कर्जतवरुन (Karjat) मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत नोकरी, कामानिमित्त येत असतात. त्यात त्यांची वेळेची बचत झाल्यास त्यांना आणखी फायदा होऊ शकेल. या मार्गामुळे एकाच लोकलमधून दोन्ही मार्गातील लोकांना जाता येत असल्यानं मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.

पनवेल ते कर्जत एकूण 29.6 किलो मीटरच्या रेल्वे मार्गिकेमुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणारा आहे. सध्या कर्जत ते सीएसएमटीला धिम्या लोकलनं येण्यासाठी 2 तास 19 मिनिटं लागतात. हा मार्ग कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा जोडला गेल्यानं हा लोकल प्रवास 1 तास 50 मिनिटं होईल. या प्रकल्पासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला 2,782 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गाचे अर्थ वर्कचे कंत्राट तसंच छोटं ब्रिज, रेल्वे फ्लायओव्हर, उड्डाणपूर तसंच रोड अंडर ब्रिजचं कंत्राट यांना अंतिम स्वरुप दिलं आहे. या तीन कंत्राटांसाठी साइटवर जमीन सपाटीकरणाची प्राथमिक कामं सुरू असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

असा असणार मार्ग?

पनवेल आणि कर्जत यांना जोडणारा मार्ग एकेरी, खालापूर आणि कर्जत तालुक्यातून जातो. काही मालगाड्या तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या त्यावरुन धावतात. हा मार्ग दुपदरी करण्यात येत आहे. नवा प्रस्तावित पनवेल-कर्जत मार्ग सध्याच्या मार्गाला जवळपास समांतर बांधण्यात येत आहे. सध्याच्या मार्गावर दोन बोगदचे आहेत. नव्या मार्गावर तीन बोगदे बांधण्यात येणार आहेत. 220 मीटर लांबीचा एक बोगदा नधालजवळ बांधला जात असून दुसरा सुमार 2600 मीटर लांबीचा आणि तिसरा वावराळे आणि कर्जतदरम्यान बांधला जात आहे.