मुंबई महापालिका आरक्षण सोडती विरोधात मुंबई काँग्रेस हायकोर्टात जाणार; रवी राजा यांचे शिवसेनेवर गंभीर आरोप

दरम्यान मुंबई महापालिका आरक्षण सोडतीनंतर याप्रकरणी काँग्रेसकडून आम्ही हरकती नोंदवल्या. मात्र त्यावर नंतर कोणतीही सुनावणी झाली नाही. उद्या हायकोर्टात या आरक्षण सोडती बाबतीत आम्ही याचिका दाखल करणार आहोत.

मुंबई महापालिका आरक्षण सोडती विरोधात मुंबई काँग्रेस हायकोर्टात जाणार; रवी राजा यांचे शिवसेनेवर गंभीर आरोप
117 इमारती रिकाम्या केल्या
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Jun 15, 2022 | 11:29 PM

मुंबई : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) आरक्षण सोडत निघाल्या पासून ही वादाचा भोवऱ्यात सापडली आहे. याच्याआधीच महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने थेट शिवसेनेवरच हल्ला केला होता. तसेच मुंबई महापालिका आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतला होता. तर आपण या वार्ड आरक्षण सोडतीविरोधात हायकोर्टात (High Court) जाऊ असे म्हटले होते. त्यापद्धतीने आता मुंबई काँग्रेस (Mumbai Congress) उद्या मुंबई हायकोर्टात या आरक्षणा बाबतीत याचिका दाखल करून न्याय मागणार आहे. याबाबत काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी ही वार्ड आरक्षण सोडत काँग्रेसला मुंबईतून संपण्यासाठीच करण्यात आल्याचा आरोप केला.

मुंबई महापालिका आरक्षण सोडतीवरून महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाने उघड भूमिका घेतली आहे. तर काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जाहीर करण्यात आलेली निवडणूक आरक्षण सोडत ही काँग्रेसला मुंबईतून संपण्यासाठी असल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी 2017 ला वार्ड वाढवले तेव्हा सर्व प्रभागांची सोडत जाहीर करण्यात आल्याचे म्हटलं आहे. तर पूर्वनियोजित पध्दतीने केवळ 23 प्रभाग आरक्षण जाहीर करून प्रशासनाकडून जाणीवपूर्वक काँग्रेसला नुकसान व्हावे यासाठी अशी सोडत करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

कोणतीही सुनावणी झाली नाही

दरम्यान मुंबई महापालिका आरक्षण सोडतीनंतर याप्रकरणी काँग्रेसकडून आम्ही हरकती नोंदवल्या. मात्र त्यावर नंतर कोणतीही सुनावणी झाली नाही. उद्या हायकोर्टात या आरक्षण सोडती बाबतीत आम्ही याचिका दाखल करणार आहोत. आज वकीलांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच या हानिकारक आरक्षण सोडतीबाबत कोर्टात न्याय मागणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

दरम्यान याच्याआधीच मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या आरक्षण सोडतीत शिवसेकडून काँग्रेसचे खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला होता. तर वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेने फक्त स्वत:चा फायदा करुन घेतला. तर काँग्रेसच्या ज्या जागा होत्या तेथे फेरफार केल्याचाही आरोप मुंबईतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला होता. तर शिवसेनेकडून जाणीवपूर्वक मुंबईत काँग्रेसची ताकद वाढू नये याकरता प्रयत्न होत असल्याचे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटलं होतं. तर त्यावर तोडगा काढू असेही त्यांनी म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

रवी राजा यांचा आरोप

आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते रवी राजा यांनी शिवसेनेवर आरोप केला होता. तसेच नगरविकास खात्यावर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनानं मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार केला. ते म्हणाले, ‘वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांत फेरफार केला. तर काँग्रेसच्या 29 नगरसेवकांपैकी 21 नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत खालसा केले. तर वॉर्ड पुर्नरचनेनंतर वॉर्ड आरक्षण सोडतीतही काँग्रेसवर अन्याय करण्यात आला. तेही फक्त शिवसेनेच्या म्हणण्यानुसार आणि त्यांना फायदा होण्यासाठीच असे करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें