Antilia Bomb Scare: अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सूत्रधार परमबीर सिंगच, नवाब मलिक यांचा दावा

| Updated on: Feb 04, 2022 | 3:33 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना टार्गेट केलं आहे. परमबीर सिंग यांची वक्तव्ये राजकारणाने प्रेरित असून अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सुत्रधार परमबीर सिंगच आहेत, असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

Antilia Bomb Scare: अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सूत्रधार परमबीर सिंगच, नवाब मलिक यांचा दावा
अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सूत्रधार परमबीर सिंगच, नवाब मलिक यांचा दावा
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी पुन्हा एकदा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना टार्गेट केलं आहे. परमबीर सिंग यांची वक्तव्ये राजकारणाने प्रेरित असून अँटिलिया बॉम्ब प्लांटचा (Antilia bomb scare) मुख्य सुत्रधार परमबीर सिंगच आहेत, असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. सिंग यांच्या माध्यमातून खोटे आरोप करण्यात येत आहे. केंद्रसरकार परमवीरसिंग यांच्या माध्यमातून आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी व अडचणीत आणण्यासाठी कटकारस्थान रचत आहे. त्यांचे हे कटकारस्थान कोर्टात उघड होईल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मलिक यांनी अँटालिया प्रकरणी अनेक गंभीर आरोप केले आहे. सिंग यांचा या प्रकरणात काय सहभाग होता, त्यावेळी पोलीस तपासात काय उघड होणार होतं आणि एनआयए आल्यानंतर या तपासावर काय परिणाम झाला यावर मलिक यांनी प्रकाश टाकला आहे. मीडियाशी संवाद साधताना मलिक यांनी हा दावा केला आहे.

अँटिलिया बॉम्ब प्लांटनंतर मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. एटीएस या प्रकरणाचा तपास करत असताना अजून सत्य बाहेर येणार होते. त्याचवेळी एनआयएने तपास हाती घेतला. त्याचवेळी परमबीर सिंग यांच्या घरी बैठक झाली याचा उल्लेख आहे. कुरकुरे बालाजी यांच्या ईमेलचा उल्लेख आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे तयार करण्यासाठी 5 लाख रुपये देण्यात आले याचाही उल्लेख आहे, असे असताना अॅडिशनल चार्जशीट दाखल करणार असल्याचे सांगूनही एनआयएने चार्जशीट दाखल केली नाही याचा अर्थ केंद्रसरकार परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

मालेगावप्रकरणातील साक्षीदार फुटताहेत

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सातत्याने साक्षीदार फुटत असल्याची बाब समोर येत आहे ही गंभीर बाब आहे. यानिमित्ताने देशाच्या हितासाठी शहीद होणारे हेमंत करकरे यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर सरकारी वकील आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे कोर्टाने या सर्व बाबीची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सर्व स्टारप्रचारकांना सुरक्षा द्या

एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांच्यावर झालेला हल्ला ही गंभीर बाब आहे. उत्तरप्रदेश सरकारने याबाबत कडक पाऊले उचलायला हवीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक प्रचाराला येणार्‍या सर्व नेत्यांची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. त्यामुळे तात्काळ उत्तरप्रदेशच्या डीजीपींना आदेश देऊन त्या सर्व येणाऱ्या स्टार प्रचारकांची जबाबदारी उत्तरप्रदेश सरकारने घ्यावी, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

जामिनासाठी 50 लाखांची खंडणी मागत धमकी, पोलीस निरीक्षक शालिनी शर्मांसह तिघांवर गुन्हा

Republic Day Parade: राजपथावर महाराष्ट्राचा डंका, पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत पहिलं बक्षिस; सामान्य कॅटेगिरीत उत्तर प्रदेश अव्वल

Maharashtra News Live Update : नांदेडमधील तिन्ही नगराध्यक्षपदांची निवडणूक 14 फेब्रुवारीला