AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parambir Singh letter | परमबीर सिंहांना देशमुखांविरोधात एवढा मोठा गौप्यस्फोट कसा करावा वाटला? वाचा तो नेमका ट्रिगर पॉईंट कुठला?

अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. Parambir Singh Anil Deshmukh

Parambir Singh letter | परमबीर सिंहांना देशमुखांविरोधात एवढा मोठा गौप्यस्फोट कसा करावा वाटला? वाचा तो नेमका ट्रिगर पॉईंट कुठला?
Uddhav Thackeray Param Bir Singh Anil Deshmukh
| Updated on: Mar 20, 2021 | 7:51 PM
Share

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. परमबीर सिंह यांना मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहावं वाटलं याचं मूळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 18 मार्चला लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आहे. (Parambir Singh letter  why ex Mumbai Commissioner wrote letter to Chief Minister Uddhav Thackeray about Anil Deshmukh)

परमबीर सिंहांना देशमुखांविरोधात एवढा मोठा गौप्यस्फोट कसा करावा वाटला?

अनिल देशमुख यांनी लोकमत वृत्तपत्राला 18 मार्चला दिलेल्या मुलाखतीमध्ये माझ्या कार्यालयाकडून गंभीर चूका झाल्याचं म्हटलं. 1. मुंबई पोलीस आणि माझ्याकडून अँटिलिया स्फोटक प्रकरणाच्या तपासामध्ये गंभीर चुका झाल्याचं म्हटलं. 2. त्या गंभीर चुका माफ करण्यासारख्या नाहीत.3 माझी बदली प्रशासकीय मुद्यांवर झाली नसल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं, असा उल्लेख मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील पाचव्या मुद्यामध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे.

अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घ्या; देवेंद्र फडणवीसांची मागणी

‘गटबाजी प्रत्येक ठिकाणी असते, चौकशीत समजलेल्या गोष्टी माफ न करण्यासारख्या’: अनिल देशमुख

विरोधी पक्षनेते हे सगळीकडून माहिती घेत असतात. गटबाजी ही प्रत्येक ठिकाणी असते. पोलीस आयुक्तालयातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या म्हणून ही बदली करण्यात आली. चौकशीतून काही गोष्टी समोर आल्या त्या माफ करण्यासारख्या नाहीत. त्यामुळेच चौकशीत बाधा येऊ नये यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसून आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

अनिल देशमुख यांचा परमबीर सिंह यांच्यावर पलटवार

गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपांवर ट्विट करत पलटवार केला आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.  मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत होते. हे होत  असताना त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून दिसत होती. हे असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

चौकशीपासून बचावासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप, अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्या:  देवेंद्र फडणवीस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंह यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Pramvir singh letter : शरद पवारांकडे तक्रार करुनही देशमुखांवर कुठलीच कारवाई नाही? परमबीरसिंहांच्या पत्रात थेट बोट

(Parambir Singh letter  why ex Mumbai Commissioner wrote letter to Chief Minister Uddhav Thackeray about Anil Deshmukh)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.