Parambir Singh letter: अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घ्या; देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप अत्यंत खळबळजनक आहे. (anil deshmukh should resign says devendra fadnavis)

Parambir Singh letter: अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घ्या; देवेंद्र फडणवीसांची मागणी
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 7:43 PM

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप अत्यंत खळबळजनक आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यामुळे मुंबई पोलिसांची मानखाली गेली आहे. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेतून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (anil deshmukh should resign says devendra fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सेंट्रल एजन्सीमार्फत चौकशी करण्यात यावी

राज्याचे गृहमंत्रीच पोलिसांना वसूली करायला सांगणं ही गंभीरबाब आहे. पोलीस दलाचं खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. ही घटना म्हणजे कळस आहे. इतक्या वाईट प्रकारे ही परिस्थित समोर आल्याने देशमुख पदावर राहू शकत नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं सांगतानाच या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे. सेंट्रल एजन्सीकडून ही चौकशी व्हावी. सेंट्रल एजन्सी नको असेल तर कोर्टाच्या अंतर्गत ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच कारवाई करायला हवी होती

देशमुखांवर करण्यात आलेला आरोप हा राजकीय नाही. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने हा आरोप केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणात सरकारने नैतिक भूमिका घेतली पाहिजे. जे बोलतात ते कृतीत उतरवलं पाहिजे, असं सांगतानाच परमबीर सिंग यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या नजरेला आणून दिले असतील तर त्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे होती. तेव्हा कदाचित सरकारला धोका असल्याचं लक्षात आल्याने कारवाई केली नसावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (anil deshmukh should resign says devendra fadnavis)

परमबीर सिंगांचे आरोप काय?

परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे. वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहीलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल. त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो, असं सिंग यांनी म्हटलं होतं. (anil deshmukh should resign says devendra fadnavis)

संबंधित बातम्या:

Parambir Singh letter | परमबीर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र जसंच्या तसं

 गृहमंत्र्यांच्या ‘वसुली’ आदेशाचा पुरावाच परमबीरसिंहाकडून सादर, पत्रातला 10 नंबरचा मुद्दा वाचलात का?

मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.