Parambir Singh letter | गृहमंत्र्यांच्या ‘वसुली’ आदेशाचा पुरावाच परमबीरसिंहाकडून सादर, पत्रातला 10 नंबरचा मुद्दा वाचलात का?

Parambir Singh letter | गृहमंत्र्यांच्या 'वसुली' आदेशाचा पुरावाच परमबीरसिंहाकडून सादर, पत्रातला 10 नंबरचा मुद्दा वाचलात का?
अनिल देशमुख आणि परमबीर सिंग

परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील नावाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेला संवाद थेट या पत्रात दिला आहे. तारीख आणि वेळेसहित हा संवाद असल्यामुळ मोठी खळबळ उडाली आहे. हा संवाद जसाच्या तसा. (parambir singh anil deshmukh)

prajwal dhage

|

Mar 20, 2021 | 7:35 PM

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील नावाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेला संवाद थेट या पत्रात दिला आहे. तारीख आणि वेळेसहित हा संवाद असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा संवाद जसाच्या तसा.. (Parambir Singh made corruption and ransom allegations on Anil Deshmukh read all the conversation bitween Parambbir Singh and ACP Patil)

मी- पाटील, गृहमंत्री व पलांडेंनी किती बार व रेस्तराँचे व किती रुपयांचे टार्गेट दिल्याचे सांगितले ?

मी – अर्जंट प्लीज

ACP पाटील- 1750 बार व रेस्तराँ. प्रत्येकी 3 लाख रुपये. एकूण कलेक्शन अंदाजे 50 कोटी रुपये. पलांडेनी माझ्यासोबत भुजबळ होते तेव्हा ही अपेक्षा व्यक्त केली.

मी – तुम्ही पलांडेंना कधी भेटलात ?

ACP पाटील- आम्ही 4 मार्चला भेटलो

मी – तुम्ही गृहमंत्र्यांना कधी भेटलात ?

ACP पाटील- पलांडेंना भेटलो त्याच्या 4 दिवस आधी. हुक्का पार्लरसंबंधी बैठक झाली.

मी – वझे व गृहमंत्र्यांची भेट कधी झाली ?

ACP पाटील- वझे-गृहमंत्र्यांच्या भेट कधी झाले ते आता आठवत नाही.

मी – तुम्ही म्हणाला होतात की काही दिवसांपूर्वीच भेट झाली होती.

ACP पाटील- हो सर. बहुधा फेब्रुवारीच्या अखेरीस.

मी – पाटील मला आणखी काही माहिती हवीय. गृहमंत्र्यांना भेटून आल्यानंतर वझे तुम्हाला भेटला होता का ?

ACP पाटील- हो सर. वझे मला भेटला होता.

मी – गृहमंत्र्यांनी काय सांगितले आहे ते वझेंना तुम्हाला सांगितले का ?

ACP पाटील- गृहमंत्र्यांनी 1750 बार-रेस्तराँकडून प्रत्येकी 3 लाख रुपये व एकूण 40-50 कोटींच्या वसुलीचे लक्ष्य दिलेय असे वझेने सांगितले.

मी – अच्छा..म्हणजे वझेने मला सांगितले तेच तुम्हालाही सांगितलेय.

ACP पाटील- 4 मार्चला पलांडे यांनी मलासुद्धा वझेला हेच टार्गेट दिलेय ते सांगितले.

इतर बातम्या :

अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Pramvir singh letter : शरद पवारांकडे तक्रार करुनही देशमुखांवर कुठलीच कारवाई नाही? परमबीरसिंहांच्या पत्रात थेट बोट

(Parambir Singh made corruption and ransom allegations on Anil Deshmukh read all the conversation bitween Parambbir Singh and ACP Patil)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें