शाहीन बागेतील लोकच आझाद मैदानात फिरत होते: प्रवीण दरेकर

| Updated on: Jan 26, 2021 | 8:56 PM

आझाद मैदानात शेतकरी आंदोलक येत होते. एका मुस्लिम महिलेच्या हातात मला फ्लेक्स दिसला. | Pravin Darekar

शाहीन बागेतील लोकच आझाद मैदानात फिरत होते: प्रवीण दरेकर
शाहीन बागमध्ये जे लोक फिरत होते. त्यांना मी आझाद मैदानात फिरताना पाहिले होते. मोर्चाच्या आजूबाजूलाच हे लोक फिरत होते.
Follow us on

मुंबई: आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनाविषयी केलेल्या टिप्पणीवरुन शरद पवार (Sharad Pawar) यांनी खडे बोल सुनावल्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आपली बाजू मांडली आहे. शेतकरी भेंडीबाजारातून आले आहेत, असं मी का म्हटलं, याचे स्पष्टीकरण दरेकर यांनी दिले आहे. (bjp leader Pravin Darekar clarification on his statement)

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी मी आझाद मैदानात गेलो होतो. त्यावेळी आझाद मैदानात शेतकरी आंदोलक येत होते. एका मुस्लिम महिलेच्या हातात मला फ्लेक्स दिसला. त्यात शेतकरी असल्याचं लिहिलं होतं. त्यामुळे मी त्या भगिनीला भेटलो. तुम्ही मोर्चासाठी कुठून आलात म्हणून मी त्यांना विचारलं. त्यावर त्यांनी भेंडीबाजारातून आल्याचं सांगितलं. त्यामुळेच मी भेंडीबाजारात कुठून आले शेतकरी असं म्हटल्याचे दरेकर यांनी सांगितले.

शाहीन बागेतील लोकच आझाद मैदानात फिरत होते: प्रवीण दरेकर

शाहीन बागमध्ये जे लोक फिरत होते. त्यांना मी आझाद मैदानात फिरताना पाहिले होते. मोर्चाच्या आजूबाजूलाच हे लोक फिरत होते. आंदोलनात कुणीही घुसत असेल आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असेल तर ती बाब लक्षात आणून दिली तर विरोधी पक्षनेत्याचं काय चुकलं? असा सवालही त्यांनी केला.

काय म्हणाले होते शरद पवार?

आझाद मैदानावरील मोर्चासाठी शेतकरी एवढ्या लांबवरुन चालत आले होते. त्यांचे पाय सुजले होते, फोड आले होते. पण ते एका तडफेने आझाद मैदानावर पोहोचले होते. अशावेळी विरोधी पक्षनेत्याने खरंतर या शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती. मात्र, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने अशाप्रकारचे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. एकेकाळी मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, याची मला आता लाज वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांविषयी ‘तो’ प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला, म्हणाले…

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका; त्यांची संपत्ती जप्त करा: कंगना रनौत

भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी?, आंदोलनात लोकं घुसवली; प्रवीण दरेकरांची टीका

गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही; शरद पवारांचा अमित शाहांवर निशाणा

(bjp leader Pravin Darekar clarification on his statement)