AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुंबईत आज पेट्रोल 5 रुपये स्वस्त, मनसेचं कनेक्शन काय?

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा मोठा फटका इंधन वाढीवर होताना दिसत आहे. आता मुंबई करांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पेट्रोल आज पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामागे मनसेचं कनेक्शन काय? जाणून घ्या...

मोठी बातमी! मुंबईत आज पेट्रोल 5 रुपये स्वस्त, मनसेचं कनेक्शन काय?
राज ठाकरेImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 14, 2026 | 10:29 AM
Share

मीडल इस्टमध्ये अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा मोठा परिणाम जगावर होत असल्याचा दिसून येत आहे. भारतासारख्या प्रगतशील देशावर तर सर्वात जास्त परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. तीन देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे जगाला इंधन दर वाढ आणि खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींची झळ बसत आहे. भारतातील इधंन दर हे दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज मुंबईकरांना दिलासा देणारा उपक्रम हाती घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील ३६ पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना ५ रुपये प्रति लिटर स्वस्त पेट्रोल देण्यात येणार आहे.

या उपक्रमाची माहिती देताना मनसेचे विभाग अध्यक्ष जय शृंगारपुरे आणि नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, सध्या देशात महागाईने उचललेल्या कळा आणि पेट्रोल-डिझेलचे आकाशाला गेलेले दर पाहता जनतेला काही प्रमाणात दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे.

मनसेचा हा उपक्रम कशासाठी?

जय शृंगारपुरे म्हणाले, “आज जी परिस्थिती देशात आहे, महागाई वाढली आहे. पेट्रोलचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला आमच्या पद्धतीने दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत.” संदीप देशपांडे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “केंद्र सरकार भैर झाले आहे. त्यांना फक्त जनतेचा रेकॉर्ड मोडायचा आहे. आम्ही मुद्दे उपस्थित करतो तर ते म्हणतात तुमचे फक्त ७ नगरसेवक आहेत, आमचे १०० आहेत. पण सब्सिडी द्यायला हवी होती. डॉलर वाढत आहे, त्याचा परिणाम पेट्रोलच्या किंमतीवर होत आहे.”

काय आहे उपक्रम?

-मुंबईतील ३६ पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना ५ रुपये प्रति लिटर सवलत.

-फक्त दुचाकीस्वारांसाठी हा लाभ.

-राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.

मनसेने यापूर्वीही महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून अनेकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर दबाव टाकला आहे. आजचा हा व्यावहारिक उपक्रम मुंबईकरांच्या मनात सकारात्मक प्रतिसाद निर्माण करेल, अशी अपेक्षा मनसे नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता