Piyush Goyal | पीयूष गोयल यांच्या नावे मुंबईतील ‘या’ लोकसभा मतदारसंघाचा सात-बारा! कोणत्या खासदाराचा होणार पत्ता कट

Piyush Goyal | केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासाठी मुंबईत लोकसभा मतदारसंघ हेरण्यात आला आहे. त्यांचे लवकरच मुंबईत लँडिंग होण्याची शक्यता आहे. या लोकसभा मतदारसंघात त्यांच्या प्रचाराचा नारळ लवकरच फुटू शकतो. त्यात कोणत्या तरी एका भाजप खासदाराचा पत्ता कट होणार हे नक्की.

Piyush Goyal | पीयूष गोयल यांच्या नावे मुंबईतील 'या' लोकसभा मतदारसंघाचा सात-बारा! कोणत्या खासदाराचा होणार पत्ता कट
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 1:27 PM

मुंबई | 6 February 2024 : तर लोकसभा निवडणुकीचा बिगूल केव्हा पण वाजू शकतो. त्यापूर्वीच राजकीय जमीन कसण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघात भाजप पूर्वीपासूनच राजकीय अंदाज घेत आहे. भाजपची टीम कधीपासूनच कामाला लागलेली आहे. भाजपने विविध राज्यातील निवडणुकीत अनेक प्रयोग केले आहेत. आता लोकसभा निवडणुकीत पण हा प्रयोग होईल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासाठी मुंबईतील लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. त्यांच्यासाठी कोणता मतदारसंघ योग्य ठरेल, याची चाचपणी भाजप करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थात त्यासाठी एक तर एखादा मतदार संघ युतीतील सहकाऱ्यांकडून खेचून आणावा लागणार आहे. अथवा सध्याच्या एखाद्या खासदाराचा बळी तरी द्यावा लागणार आहे.

अंदाज तरी काय

पीयूष गोयल यांनी नवीन मतदार संघात उतरविण्याविषयी अनुकूल धोरण नाही. त्यांना नवीन मतदार संघातून उतरविण्यापेक्षा परंपरागत भाजपच्या मतदार संघात उतरविण्याची तालीम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन आणि उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी हे भाजपचे खासदार आहेत. या दोन पैकी एका मतदार संघात हा प्रयोग करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

सुरक्षित मतदारसंघाचा शोध

गोपाळ शेट्टी यांनी 2019 मधील निवडणुकीत सिने अभिनेत्री आणि काँग्रेसची उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा 4 लाख 65 हजार इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. दुसरीकडे पूनम महाजन यांनी पण प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवले होते. त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव केला होता. भाजपसाठी हे दोन्ही मतदार संघ सुरक्षित मानण्यात येतात. येथे परंपरागत भाजप मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे यापैकी एका मतदार संघातून पीयूष गोयल यांना उमेदवारी मिळू शकते.

यापूर्वी पण प्रयोग

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकीत दिग्गज केंद्रीय मंत्र्यांना उतरविण्याचा प्रयोग भाजपने केला आणि त्यात त्यांना यश पण आले. भाजप सध्या मोदी-शाह जोडीच्या प्रभावाखाली धक्कातंत्राचा प्रयोग करत आहे. आता राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रणधुमाळीत उतरवून त्यांना अनुभवाची शिदोरी देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे सध्या सुरक्षित मतदार संघातून या राज्यसभेतील खासदारांना नशीब आजमावता येणार आहे. पण त्यासाठी एका खासदाराचा पत्ता कट होणार, हे नक्की.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.