AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Farmers Tractor Rally: राजीनामा तो बनता है साहेब; संजय राऊत यांची मागणी

दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. (pm narendra modi should resign says sanjay raut)

Delhi Farmers Tractor Rally: राजीनामा तो बनता है साहेब; संजय राऊत यांची मागणी
संजय राऊत
| Updated on: Jan 26, 2021 | 4:10 PM
Share

मुंबई: दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी आंदोलनामागे कोणती अदृश्य शक्ती राजकारण करत आहे?, असा सवाल करतानाच दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राजीनामा तो बनता है साहेब, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांचा रोख थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच दिशेने असल्याने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाल्याची चर्चा आहे. (pm narendra modi should resign says sanjay raut)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकामागोमाग तीन ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरले आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनीया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार की जो बायडनचा? इस बात पर त्यागपत्र…राजीनामा तो बनता है साहेब, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

ही लोकशाही नाही भाऊ

दुसऱ्या ट्विटमध्येही राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारे लगावले आहेत. सरकार याच दिवसाची अतुरतेने वाट पाहत होती का? शेवटपर्यंत सरकारने लाखो शेतकऱ्यांचं ऐकलं नाही. ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे. ही लोकशाही नाही भाऊ, दुसरंच काही तरी सुरू आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

अदृश्य हात राजकारण करत आहेत का?

तिसऱ्या ट्विटमध्ये राऊत यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. सरकारच्या मनात आलं असतं तर हिंसा रोखली गेली असती. दिल्लीत जे काही सुरू आहे. त्याचं कुणीच समर्थन करू शकत नाही. कुणीही लाल किल्ला आणि तिरंग्याचा अवमान सहन करणार नाही. पण वातावरण का बिघडलं? सरकार शेतकरी विरोधी कायदे रद्द का करत नाही? यामागे काही अदृश्य हात राजकारण करत आहेत का? असे सवालही राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

हिंसा हा पर्याय नाही- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही समस्या सोडण्यासाठी हिंसा हा त्याचा पर्याय असूच शकत नाही. कुणालाही मार लागला तरी आपल्या देशाचंच नुकसान होणार आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. (pm narendra modi should resign says sanjay raut)

शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का?

‘टीव्ही 9 भारतवर्ष’नेही शेतकरी नेते नरेश टिकैत यांना काही प्रश्न केले. शेतकरी आंदोलकांनी पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी मार्ग बदलले. बॅरिकेट्सही तोडल्या. आंदोलनात दारूच्या बाटल्या सापडत आहेत, असं टिकैत यांना विचारलं. त्यावर टिकैत भडकले. मग काय शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का? असा सवाल टिकैत यांनी केला. (pm narendra modi should resign says sanjay raut)

संबंधित बातम्या:

Delhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या

दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धीत ट्रॅक्टर रॅली, अण्णा हजारेंनी दाखवला हिरवा झेंडा

Delhi Farmers Tractor Rally LIVE | दिल्लीतील इंटरनेटसेवा बंद, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

(pm narendra modi should resign says sanjay raut)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.