Delhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या

शेतकऱ्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिस थेट रस्त्यावर बसले.

Delhi Farmer Tractor Rally : 'पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला', नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 3:31 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांकडून आज ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. पण या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठी हिंसा पाहायला मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी थेट राजधानी दिल्लीत घुसून लाल किल्ल्यावर ताबा मिळवला आहे. शेतकऱ्यांकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनीही लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनीही मग मोठ्या प्रमाणात हिंसा घडवून आणल्याचं चित्र आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत दिसत आहे.(Delhi Police agitation to stop farmers)

दरम्यान, नांगलोई परिसरात आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनीच रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिस थेट रस्त्यावर बसले. पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर चालवावा लागेल, असं आव्हानच पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्याचं चित्र याठिकाणी दिसून आलं.

हिंसाचाराला सुरुवात कुठून झाली?

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दुपारी 12 वाजेची वेळ दिली होती. पण संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांचं न ऐकता शेतकऱ्यांनी ही रॅली काढली. तसेच शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती. मात्र, या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यातच दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याचवेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यास सुरुवात केली. तिथूनच मोठ्या प्रमाणात आंदोलन चिघळण्यास सुरुवात केली.

शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का?- टिकैत

पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उसळली असून शेतकऱ्यांना नियंत्रित शक्य नाही. पोलिसांनी केलेल्या या लाठीमारवर भारतीय किसान यूनिनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का? असा संतप्त सवाल करतानाच आंदोलनाला हिंसक वळण देणारे शेतकरी आंदोलक हे भरकटलेले आहेत, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

Delhi Farmer Protest : दगडफेक, लाठीचार्ज ते घमासान, शेतकरी आंदोलनातील 10 मोठ्या घडामोडी

Delhi Police agitation to stop farmers

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.