AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Farmer Protest : दगडफेक, लाठीचार्ज ते घमासान, शेतकरी आंदोलनातील 10 मोठ्या घडामोडी

रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमनेसामने आले. त्यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण मिळालं.

Delhi Farmer Protest : दगडफेक, लाठीचार्ज ते घमासान, शेतकरी आंदोलनातील 10 मोठ्या घडामोडी
| Updated on: Jan 26, 2021 | 2:55 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर पुकारलेल्या शेतकरी आंदोलनाला आज दोन महिन्यांनंतर हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली पोलिसांची परवानगी घेऊन शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. पण यावेळी शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस आणि शेतकरी यांच्यात मोठा राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.(Violent turn to the Farmer Protest in Delhi, 10 major developments)

दगडफेक

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण मिळालं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमनेसामने आले. त्यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. केंद्र सरकार, गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांनी याबाबत आधीच शंका व्यक्त केली होती आणि तेच चित्र आज दिल्लीच्या रस्त्यांवर पाहायला मिळालं.

शेतकरी नेत्यांचे दावे फोल

आम्ही अत्यंत शांतीपूर्ण पद्धतीनं आंदोलन करु, प्रजासत्ताक दिनी काढल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीत कुठल्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही. असा दावा शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केला होता. पण आज प्रत्यक्षात बरोबर उलटं चित्र पाहायला मिळालं. ट्रॅक्टर रॅली निघताच आंदोलक शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

हिंसाचाराला सुरुवात कशी झाली?

ट्रॅक्टर रॅली दरम्यान शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली.

पोलिसांचा लाठीचार्ज

आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न सुरु केल्यावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकऱ्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनीही लाठीचार्ज सुरु केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडले. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला.

गाझीपूर बॉर्डरवर संघर्ष

दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॉर्डरवर मोठे कंटेनर आडवे लावले होते. गाझीपूर बॉर्डरवरही अशाच प्रकारचा एक कंटेनर रस्त्यावर आडवा लावण्यात आला होता. तेव्हा शेतकऱ्यांना तो कंटेन बाजूला करुन दिल्लीकडे कूच केले. दिल्ली पोलिसांकडून या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केले जाणारे सर्व पर्यत्न तोकडे पडताना पाहायला मिळत आहेत. याच ठिकाणी पोलीस आणि शेतकरी समोरासमोर आले. शेतकऱ्यांकडून बॅरिकेट्स तोडण्याचे प्रयत्न केले गेले. तेव्हा पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले.

लाल किल्ल्यावर पोहोचले ट्रॅक्टर

एकिकडे जिथे आयटीओवर आताही पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरसह लाल किल्ल्यावर धडक दिली आहे. आपले ट्रॅक्टर घेऊन हे शेतकरी लाल किल्ला परिसरात घिरट्या मारताना दिसत आहेत.

पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

सेंट्रल दिल्लीतील आयटीओ परिसरात एका शेतकऱ्यांना ट्रॅक्टर थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोन महिन्यांपासून अत्यंत शांततेच्या मार्गान सुरु असलेलं हे आंदोलन अचान इतकं का चिघळलं. थेट पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यापर्यंत शेतकरी का आक्रमक झाले असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

अचानक बिघडली परिस्थिती

टॅक्टर रॅली दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत दिल्लीच्या ठरवून दिलेल्या मार्गावर होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यातही फक्त 5 हजार ट्रॅक्टर सहभागी होतील असं ठरलं होतं. मात्र, आज सकाळपासून दिल्लीतील चित्रच पूर्ण पालटलं. कारण, आंदोलक शेतकऱ्यांनी थेट दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या हिंसाचारामुळं दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचं पाहायला मिळत आहे

मेट्रो बंद

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ मेट्रो स्टेशनचे सर्व एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे बादली, रोहिणी सेक्टर 18-19, हैदरपूर बादली मोड, जहांगीरपुरी, आदर्श नगर, आझादपूर, मॉडल टाउन, जीटीबी नगर, विद्यापीठ, विधानसभा आणि सिविल लाइन्समधील मेट्रोचे गेट बंद करण्यात आले आहेत.

रस्ते बंद

दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानं सामान्य नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली असून वाहतुकीसाठी रस्ता उघडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांनी जीटी करनाल रोड, आऊटरिंग रोड, बादली रोड मधुबन चौक, नरेला रोड आदी मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली असून या मार्गावरून प्रवास न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसेच वजीराबाद रोड, आयएसबीटी रोड, पुश्ता रोड, विकास मार्ग, एनएच-24 रोड आणि नोएडा लिंक रोडवरही वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

संबंधित बातम्या :

प्रजासत्ताक दिनी दिल्ली धुमसली, शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक, संयमी रॅली ते अंसतोष, वाचा सविस्तर

पोलिसांची व्हॅन, क्रेनवर आंदोलकांचा ताबा, मेट्रो बंद, शेतकरी आंदोलनाने तणाव; दिल्लीला छावणीचं स्वरुप

Violent turn to the Farmer Protest in Delhi, 10 major developments

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.