मोठी बातमीः मुंबईकरांना 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी मिळण्याची शक्यता!

| Updated on: Dec 29, 2021 | 9:44 AM

मुंबईकरांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. 500 चौरस फूट घरे असलेल्यांना मालमत्ता करात माफी मिळणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा मालमत्ता कर भरण्याची गरज लागणार नाहीये. विशेष म्हणजे याबद्दलची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

मोठी बातमीः मुंबईकरांना 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी मिळण्याची शक्यता!
सांकेतिक फोटो
Follow us on

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. 500 चौरस फूट घरे असलेल्यांना मालमत्ता करात (Property tax) माफी मिळणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा मालमत्ता कर भरण्याची गरज लागणार नाहीये. विशेष म्हणजे याबद्दलची प्रक्रिया देखील सुरू झाल्याची माहीती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. यामुळे आता मुंबईमध्ये 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासाच मिळणार आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्वाची माहीती

शिवसेनेनी मुंबई महापालिका निवडणूकीच्या जाहिरनाम्यामध्ये दिले होते की, महापालिकेवर आमची सत्ता आली की, आम्ही 500 चौरस फुटांच्या घरावरील मालमत्ता कर सरसगट माफ करू. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये याबद्दल प्रश्न विचारला असता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत माहीती दिली आहे की, याबद्दल महापालिकेचा प्रस्ताव आला आहे आणि त्याबद्दल काम देखील सुरू आहे.

मालमत्ता करात माफी मिळण्याची शक्यता 

महाविकास आघाडी सरकार याबद्दल प्रयत्नशिल आणि सकारात्मक आहे. लवकर आम्ही याबाबत घोषणा करू असे एकनाथ शिंदे म्हणाले. 500 चाैरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी 340 कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये 500 चाैरस फुटांचे जवळपास 15 लाख घरे आहेत. ज्यामध्ये 28 लाख कुटुंब राहतात. यामुळे या कुटुंबियांना मोठा दिलासा सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेदवार देणार, भाई जगताप यांचा पुनरुच्चार

Video | अधिवेशनाच्या 5 दिवसांत किती जणांना कोरोना झाला? अजित पवारांनी सांगितली आकडेवारी