AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्णेकर यांच्या हत्येवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सूत्रधार शिंदे गटात…

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवर संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले. पूर्णेकरांच्या हत्येचे सूत्रधार शिंदे गटात असल्याचा दावा राऊत यांनी केला. ठाण्यातील वाढत्या गुन्हेगारीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही राऊत यांनी केली.

पूर्णेकर यांच्या हत्येवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सूत्रधार शिंदे गटात...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 10:51 AM
Share

ठाकरे गटाचे शिवसैनिक प्रदीप पूर्णेकर यांची काल ठाण्यात हत्या झाली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या हत्येवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. प्रदीप पूर्णेकर हे ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठाणे हे गेल्या काही काळापासून गुन्हेगारांचा अड्डा आणि आश्रयस्थान बनलं आहे. या राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करतानाच पूर्णेकरांना ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांचे सूत्रधार शिंदे गटात आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

या राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे. त्यांना प्रश्न केला तर ते मागच्या 10 वर्षापूर्वीचे आकडे देतील. ठाण्यात एका महिन्यात पाच लोकांच्या हत्या झाल्या आहेत. 25 सप्टेंबर रोजी किसन भोईर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाली. गस्तीवर असताना वागळे इस्टेट येथे ही हत्या झाली. काल पूर्णेकरांची हत्या झाली. हत्यांची मालिका सुरू आहे. काय करत आहे गृहखातं? काय करत आहेत ठाण्याचे पोलीस आयुक्त? पोलीस आयुक्त मंत्र्यांचे घरगडी आहेत का? ठाण्यात गृहखात्याची रेंज पोहोचत नाही का? असा सवाल संजत राऊत यांनी केला. फडणवीस यांच्या नकाशावर ठाणे येत नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. लज्जास्पद गृहमंत्री म्हणून इतिहासात त्यांची नोंद राहील, असं संजय राऊत म्हणाले.

लाज वाटायला पाहिजे…

प्रदीप पूर्णेकर यांनी निवडणूक लढवली होती. थोड्या मताने त्यांचा पराभव झाला होता. माजी महापौर मिनाक्षी शिंदेंसोबत त्यांचा राजकीय संघर्ष सुरू होता. बिल्डरांच्या माध्यमातून लोकांना बेघर करण्याचं काम सुरू होतं. मनोरमा नगरमध्ये बिल्डरांना वसाहती निर्माण करायच्या होत्या. त्याविरोधात पूर्णेकर लढत होते. कलस्टर विरोधातही ते लढत होते. त्या भागाचा तबाब ड्रग्स रॅकेटर्सनी घेतला होता. या रॅकेटर्सना शिंदे गटाच्या लोकांचा पाठिंबा होता. या रॅकेटविरोधात पूर्णेकर यांनी लढा उभारला होता. त्यांनी सातत्याने या विरोधात पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या. पूर्णेकर सामाजिक भान ठेवून काम करत होते. लोकांना बेघर करणाऱ्या विरोधकांविरोधात लढत होते, त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू लागला तेव्हा त्यांची हत्या करण्यात आली. त्याची फडणवीस यांना लाज वाटायला पाहिजे. पण शेवटी ही मोदी शाहांची पिलावळ असल्याने लाज वाटणार नाही. माझी भाषा झोंबेल. पण पूर्णेकरांच्या घरी जाऊन आकांत पाहा, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

हत्येला शिंदेच जबाबदार

या प्रकरणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची ताबडतोब हकालपट्टी करण्यात आली पाहिजे. 12-12 वर्ष हे अधिकारी एकाच पदावर बसले आहेत. कुणाच्या आशीर्वादाने बसले? आयुक्त पालकमंत्र्यांचा घरगडी आहेत. एका कार्यकर्त्याची रात्री गोळ्या झाडून हत्या होते. ही गंभीर गोष्ट आहे. फडणवीस यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्यांचे सूत्रधार शिंदे गटात आहेत. त्यांना अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली. या हत्येमागे मिनाक्षी शिंदे, त्यांचे कुटुंब आणि त्यांनी पोसलेली गुंडांची टोळी जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट