AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपकेचा फुगा आज फुटला, पूर्णपणे फेल गेलेलं आंदोलन बघितलं, नौटंकीची स्क्रिप्ट… भाजपची जोरदार टीका

शिवाजी पार्क येथील आंदोलनावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. आंदोलनात विद्यार्थ्यांचा प्रश्न बाजूला पडून ज्ञानेश कुमार यांना समोर ठेवून राजकीय नौटंकी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आंदोलनातील उपस्थितीही अत्यल्प असल्याचे दरेकर म्हणाले.

दीपकेचा फुगा आज फुटला, पूर्णपणे फेल गेलेलं आंदोलन बघितलं, नौटंकीची स्क्रिप्ट... भाजपची जोरदार टीका
CJP Protest at Shivaji ParkImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 8:45 PM
Share

शिवाजी पार्क येथे झालेल्या सीजेपीच्या आंदोलनावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. हे आंदोलन पूर्णपणे फेल गेल्याचा दावा दरेकर यांनी केला. विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, मात्र त्यावर निर्णय झालेला असताना ज्ञानेश कुमार यांना समोर ठेवून राजकीय नौटंकी करण्याचा प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले. तसेच आंदोलनातील उपस्थितीही खूप कमी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.  दरेकर म्हणाले की, आंदोलनात उबाठाचे आमदार महेश सावंत, साईनाथ दुर्गे आणि मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अभिजित दिपके यांना अनेक वेळा शांत बसण्यास सांगावे लागले. ते म्हणाले की, आंदोलनात राजकारण भरलेली नौटंकी पाहायला मिळाली.

दरम्यान, दिपके यांनी केलेल्या काही वक्तव्यांवरही दरेकर यांनी आक्षेप घेतला. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची दरेकरांनी निषेध केला. नेहरूंच्या बुद्धिमत्तेमुळे बाबासाहेब घडले, वाढले आणि महान झाले, असे वक्तव्य केल्याचा दावा करत दरेकर यांनी दिपके यांनी याबाबत माफी मागावी, अशी मागणी केली.

SIR प्रक्रियेवरही भाष्य

SIR म्हणजे मतदार यादी शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे, नावं काढण्याची प्रक्रिया नाही, असे दरेकर यांनी सांगितले. अपात्र किंवा दुहेरी नोंदणी असलेली नावं नियमानुसार काढली जात असून त्यासाठी क्लेम आणि ऑब्जेक्शनची प्रक्रियाही असल्याचे त्यांनी म्हटले. सीजेपीला राजकारण करायचे असून मुद्दा घेऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. ज्ञानेश कुमार ही व्यक्ती नसून ते मुख्य निवडणूक आयुक्त असल्याचे सांगत त्यांनी आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला.

दरेकर यांनी अभिजीत दिपके यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेलाही प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा अभ्यास करावा, असे ते म्हणाले. तसेच फडणवीस हे संघाच्या मुशीत तयार झालेले नेते असून खुर्चीसाठी त्यांनी कधीही राजकारण केलेले नाही, असा दावा दरेकर यांनी केला.

मोदी यांच्यावरही दिपके यांनी केलेल्या टीकेवर दरेकर यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या कामाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव असल्याचा दावा त्यांनी केला. संघाबाबतची वक्तव्ये करताना आंदोलनाचा मूळ मुद्दा बाजूला पडला आणि राजकीय नौटंकी पाहायला मिळाली, असा आरोप त्यांन केला.

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?