राज ठाकरे डिप्लोमॅटिक नाहीत, त्यांच्याकडे यूटर्न नसतो; दरेकरांकडून राज यांची स्तुती, मुख्यमंत्र्यांना टोला

| Updated on: Mar 07, 2021 | 5:56 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असून त्यांच्या या निर्णयाचे त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केले आहे. (pravin darekar taunt cm uddhav thackeray over nanar refinery project)

राज ठाकरे डिप्लोमॅटिक नाहीत, त्यांच्याकडे यूटर्न नसतो; दरेकरांकडून राज यांची स्तुती, मुख्यमंत्र्यांना टोला
pravin darekar
Follow us on

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असून त्यांच्या या निर्णयाचे त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केले आहे. राज ठाकरे हे डिप्लोमॅटिक नाहीत. त्यांच्याकडे यूटर्न नसतो अशा शब्दात राज यांची स्तुती करतानाच दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (pravin darekar taunt cm uddhav thackeray over nanar refinery project)

राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधून राज यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. राज यांनी कधीकाळी विरोध केला होता. आता त्यांनी त्यांनी तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यानंतर आता त्यांचा या प्रकल्पावर विश्वास बसला आहे. कोकणाच्या प्रगतीसाठीच राज यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करत आहोत, असं दरेकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंना आवाहन

भाजपने नेहमीच विकासाची बाजू मांडली आहे. त्यात कधीही तडजोड केली नाही. या प्रकल्पामुळे कोकणची आर्थिक प्रगती होत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकल्पाला समर्थन द्यावे. शिवसेनेला कोकणाने भरभरून दिलं आहे. कोकण नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केले. राज ठाकरे यांच्यासोबत मी काम केलं आहे. ते डिप्लोमॅटिक बोलत नाहीत. त्यांचा कधी यूटर्न नसतो. ते एखाद्या गोष्टीला बेधडक समर्थन देतात किंवा विरोध करतात. त्यांच्याकडे यूटर्न असा नसतो, असं सांगत दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमकिा घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. सरकारने नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू, असं सांगतानाच सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राला परवडणार नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर सगळेच संदर्भ बदलले आहेत. आपल्या राज्यात, देशात गुंतवणूक यावी ह्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बेंगळुरूत गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरु आहे हे मी वाचलं. ही बातमी क्लेशदायक होती. आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’ (नाणार) सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. (pravin darekar taunt cm uddhav thackeray over nanar refinery project)

 

संबंधित बातम्या:

‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

आकडा फायनल झाल्यावर शिवसेनाही नाणारला पाठिंबा देईल; नितेश राणेंचा गंभीर आरोप

हिंमत असेल तर राज यांनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी; शिवसेनेचं आव्हान

(pravin darekar taunt cm uddhav thackeray over nanar refinery project)