आकडा फायनल झाल्यावर शिवसेनाही नाणारला पाठिंबा देईल; नितेश राणेंचा गंभीर आरोप

नाणार प्रकल्पाला मनसेने पाठिंबा दिल्याबद्दल भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. (bjp leader nitesh rane slams shiv sena over Nanar refinery project)

आकडा फायनल झाल्यावर शिवसेनाही नाणारला पाठिंबा देईल; नितेश राणेंचा गंभीर आरोप
नितेश राणे (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 1:50 PM

मुंबई: नाणार प्रकल्पाला मनसेने पाठिंबा दिल्याबद्दल भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. तर शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेची कंपनीसोबत डिलिंग सुरू आहे. आकडा फिक्स होताच शिवसेना नाणारला पाठिंबा देईल, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. (bjp leader nitesh rane slams shiv sena over Nanar refinery project)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणारला पाठिंबा दिला आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणीही केली आहे. त्याबाबत बोलताना नितेश राणे यांनी राज यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. भाजपने पहिल्या दिवसापासून नाणारला पाठिंबा दिला आहे. जनतेची भावना आता बदलली आहे. प्रकल्प व्हावा असं लोकांचं मत आहे. कोकणात रोजगार आणि विकासाचा प्रकल्प व्हावा असं लोकांना वाटत आहे. या प्रकल्पाबाबतचे लोकांचे गैरसमज दूर झाले आहेत. स्थानिकांनी राज यांना त्यांची भूमिका सांगितली असेल. त्यामुळे राज यांनीही नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असेल. राज यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागतच करतो, असं नितेश यांनी सांगितलं.

शिवसेनेचे आमदार राजन साळवी हे गेल्या 15 वर्षांपासूनचे आमदार आहेत. ते लोकांमध्ये फिरतात. त्यांनी लोक भावना समजून घेऊनच पाठिंबा दिला आहे. येथील शिवसैनिकांनाही हा प्रकल्प व्हावा असं वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेनेही स्थानिकांच्या भूमिकेचा आदर केला पाहिजे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत:च्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं ऐकत नाहीत. नाणार कंपनीसोबत त्यांची मागच्या दाराने चर्चा सुरू आहे. आकडा फायनल होत नाही तोपर्यंत सेनेचा या प्रकल्पाला विरोध राहिल. जेव्हा आकडा फिक्स होईल तेव्हा ते पाठिंबा देतील, अशी टीकाही त्यांनी केली. मातोश्री आणि स्थानिक जनतेचा काहीच संपर्क उरलेला नाही. मातोश्रीशी जनतेशी संवाद तुटला आहे. कोविड काळात आपण ते पाहिलं आहे, असंही ते म्हणाले.

हिरेन आत्महत्याप्रकरणाचा रिपोर्ट योग्य नाही

यावेळी त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. हिरेना आत्महत्याबाबतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे. हा रिपोर्ट योग्य नाही. राज्यातील पोस्टमार्टम विभागावरच माझा आक्षेप आहे. पोस्टमार्ट विभाग हा राजकीय शाखा बनला आहे, असा आरोपही त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणाचा रिपोर्ट अजून आलेला नाही. त्यामुळे हिरेन कुटुंबीयांनी या रिपोर्टवर विश्वास का ठेवावा? असा सवाल करतानाच हिरेन यांचा रिपोर्ट संशयास्पद आहे. या सरकारच्या काळात आत्महत्या किंवा मोठ्या घटनांबाबतच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कलानगरमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन कसं?

वरळीत रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे शुटिंग सुरू होतं. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्यावरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. दिशा पटानी आणि इतर कलाकारांना सवलती का मिळतात हे सांगायची गरज नाही. तसेच कलानगरमध्ये दोन कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री राहत असताना एका बारमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन कसं केलं जात? हे कोणाच्या पाठिंब्याने होते? असा सवाल करतानाच मुख्यमंत्री इतरांना कोरोनाचे नियम पाळायला सांगतात. पण नाकाखाली काय सुरू हे पाहत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. (bjp leader nitesh rane slams shiv sena over Nanar refinery project)

संबंधित बातम्या:

‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत

आजी-आजोबा गाणं गात भिक्षा मागायचे, पहिल्याच स्टेज परफॉर्मन्सवेळी ड्रेस नव्हता; वाचा, आनंद शिंदेंची फिनिक्स भरारी!

(bjp leader nitesh rane slams shiv sena over Nanar refinery project)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.