AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सणासुदीच्या काळात डाळींना महागाईचा तडका! चणा, तूर, मूग डाळींच्या दरात वाढ, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री

मुंबईसह महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये चणा, तूर आणि मूग डाळींच्या दरात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. घाऊक दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारावरही होत असून ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

सणासुदीच्या काळात डाळींना महागाईचा तडका!  चणा, तूर, मूग डाळींच्या दरात वाढ, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री
PRICE HIKE Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 10, 2026 | 4:52 PM
Share

महाराष्ट्रात दुष्काळ पडलायं आणि त्याचा फटका फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर ग्राहकांच्या खिशाला देखील बसणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात डाळींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात डाळींच्या किमती 10 ते 20 रूपयांनी वाढल्या आहेत, तर किरकोळ बाजारात काही डाळींचे दर २० ते ३० रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे रोजच्या जेवणात लागणाऱ्या डाळींसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

घाऊक बाजारात डाळींचे दर किती पटीने वाढले ?

कमी पाऊस, वाढती गरमी यांमुळे पीक पार करपून गेली आहेत. विहिरींनी तळ गाठली आहेत, पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाण्याची भीषण कमतरता सध्या महाराष्ट्रात जाणवत आहे. महाराष्ट्रात यावर्षी कोरडा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात गेल्या काही आठवड्यांत डाळींच्या पुरवठ्यांवर परिणाम झाला आहे. बाजारात धान्य आणि डाळींची आवक कमी झाली आहे.

डाळींची किंमत घाऊक बाजारातील दरानुसार

आधीची किंमत प्रति किलो            प्रति किलो  वाढलेला दर

चणा डाळ                                                                         72 रूपये                  82 रूपये

तूर डाळ                                                                              90 रूपये               105 रूपये

मूग डाळ                                                                           95 रूपये               105 रूपये

किरकोळ बाजारातही दरवाढ

घाऊक बाजारातील वाढीचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसत आहे.

आधीची किंमत प्रति किलो            प्रति किलो   वाढलेला दर चणा डाळ                                       110 रूपये                                             130 रूपये

तूर डाळ                                         120 रूपये                                            150 रूपये

मूग डाळ                                                                                                    140 रूपये

सणासुदीच्या काळात डाळींच्या पदार्थांचे प्रमाण वाढतं. याशिवाय डाळ ही रोजच्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ असल्याने सर्वसामान्यांच्या महिन्याच्या खर्चावर याचा परिणाम होणार आहे. पुरवठा कमी झाला आणि सणासुदीच्या काळात डाळींची मागणी वाढली तर किमतीवर त्याचा आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदी करताना स्थानिक बाजारातील भाव तपासणं ग्राहकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा