AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात महायुतीमधील दोन दादांवरून राजकीय टोलेबाजी

पुण्यातल्या हॉटेलच्या बाथरुम मध्ये तरुणांचा ड्रग्ज घेतातानाचा व्हिडीओ समोर आला. मात्र, राजकीय टोलवाटोलवी महायुतीतल्याच 2 दादांवरुन सुरु झाली. सुरुवात चंद्रकांत पाटलांनीच केली. नेमकं चंद्रकांत पाटील काय म्हणाले जाणून घ्या.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात महायुतीमधील दोन दादांवरून राजकीय टोलेबाजी
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांचा प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 24, 2024 | 10:38 PM
Share

आपण पुण्याचे पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. अर्थात चंद्रकांत पाटलांच्या बोलण्यातून अर्थ स्पष्ट निघतोय की, रोख सध्याच्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडेच आहे. मात्र काही तरी गडबड झाली हे लक्षात येताच चंद्रकांत पाटलांनी नंतर सारवासारव केली. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शाब्दिक तोफा सुटल्याच.

पब, हफ्ता वसुली आणि डान्सबारला राजाश्रय चंद्रकांत पाटलांचाच होता असं मिटकरी म्हणालेत. तर पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटलांनी फक्त खुर्च्या गरम केल्या, असं सुरज चव्हाण म्हणालेत म्हणजे महायुतीतच शाब्दिक खटके उडाले. तर ज्या पुण्यातल्या L3 लिक्विड लिजर लाऊज पब मधला ड्रग्जचा व्हिडीओ समोर आला. त्या पब वर पतित पावन संघटनेनं दगडफेक करत तोडफोड केली मनसेनंही पबच्या बाहेर आंदोलन केलं. पब संस्कृती बंद करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

पुण्यात नुकतंच पोर्शे कारनं दारु नशेत अल्पवयीन मुलानं दोघांना चिरडल्याचं प्रकरण समोर आलं. तरीही पुण्यात पहाटे 3-3 वाजेपर्यंत पब कसे सुरु राहतात, हे L3 पबमधला व्हिडीओ समोर आल्यावर स्पष्ट झालं. दोन अल्पवयीनं तरुणांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. यात 2 तरुणी ड्रग्जचं सेवन करताना दिसत आहेत.

एका तरुणीच्या मोबाईलवर ड्रग्जच्या 2 कांड्या आहेत. हे व्हिडीओ शुटिंगही एका महिलेचं केलंय. त्या महिलेचा आवाज या व्हिडीओत रेकॉर्ड झालाय. पुण्यातल्या ड्रग्जच्या घटनेवरुन पुण्याचे काँग्रेसचे आमदार धंगेकरांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितला. व्हिडीओत ड्रग्ज घेणाऱ्या तरुण तरुणींचा शोध घेत असल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं. तर कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना दिलेत.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.