AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सवात दारू विक्रीवर बंदी… कोर्ट संतापले; न्यायाधीश म्हणाले, अशाने तर 10 दिवस…

पुणे जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवादरम्यान 10 दिवसांच्या दारूबंदीचा आदेश काढला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत प्रश्न विचारले: केवळ पुण्यातच बंदी का? हा तर्क काय? अशाने व्यसनाधीन व्यक्तींना त्रास होईल आणि रुग्णालये भरतील, अशी मिश्किल टिप्पणी करत कोर्टाने आदेश मागे न घेतल्यास हस्तक्षेप करण्याचा इशारा दिला.

गणेशोत्सवात दारू विक्रीवर बंदी... कोर्ट संतापले; न्यायाधीश म्हणाले, अशाने तर 10 दिवस...
Pune liquor banImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2026 | 4:39 PM
Share

संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम असते. या 10 दिवसात दारू विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश पुणे जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयावर कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. फक्त एका जिल्ह्यातच दारू विक्रीला बंदी का? मुंबईसह महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात अशा प्रकारची कोणतीच बंदी नाहीये, अशा शब्दात कोर्ट प्रशासनाच्या निर्णयावर भडकले. अशा पद्धतीने 10 दिवस दारू बंदी असेल तर तळीरामांनी रुग्णालय भरेल, अशी मिश्किल टिप्पणी करत हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्हाला त्यात हस्तक्षेप करावा लागेल, असंही कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, कोर्टाने फटकारल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात फक्त दोनच दिवस ड्राय डे करण्यात येणार आहे. सरकारकडून सूचना घेऊन सरकारी वकिलांनी आदेशात बदल केले जातील, अशी माहिती कोर्टाला दिली.

पुण्यात गणेशोत्सव काळात 10 दिवसांसाठी दारूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णया विरोधात हॉटेल मालक आणि दारू विक्रेत्यांच्या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एमसी त्रिपाठी आणि जस्टिस अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ज्यांच्याकडे दारू विक्रीचे परवाने आहे. त्यांना 10 दिवस दारू विक्रीला बंदी घालून व्यवसाय करायला थांबवणं ही मनमानी आहे, अशा शब्दात कोर्टाने जिल्हा प्रशासनाला फटकारलं.

केवळ एकाच जिल्ह्यात बंदी का?

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 14 सप्टेंबरपासून 10 दिवस दारू विक्रीवर बंदी घातली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयालाच कोर्टात आव्हान देण्यात आले होते. केवळ पुण्यामध्येच दारू बंदी का? एकाच जिल्ह्याची का निवड करण्यात आली? या मागचा तर्क काय आहे? आम्ही अशा प्रथेचा निषेध नोंदवतो. हा पुण्याच्या लोकांसाठी एक कलंक आहे. केवळ पुण्यातील लोकच दारू प्यायल्यावर चुकीचं वागतात असं तुम्हाला दाखवायचं आहे का? असा संताप व्यक्त करतानाच तुम्ही संपूर्ण राज्यात एकच जिल्हा का निवडत आहात? असा सवालही कोर्टाने केला.

तर रुग्णालयात दारूड्यांची भरती

तुम्ही आदेश मागे घेणार आहात की नाही हे सांगा, असं कोर्टाने जिल्हाधिकाऱ्याच्या वकिलाला विचारलं. तुम्ही आदेश मागे नाही घेतला तर आम्ही उचित आदेश पारित करू, असं कोर्ट म्हणालं. अशा प्रकारची बंदी घातल्याने दारूचं व्यसन असणाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. जर 10 दिवस दारू नाही घेतली तर दारूड्यांनी रुग्णालये भरतील, अशी मिश्किल टिप्पणी मुख्य न्यायाधीश त्रिपाठी यांनी केली.

उद्या सुधारणा करू

यावेळी सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली. नियमानुसार वर्षातील 8 दिवस हे ड्राय डे आहेत. त्यात अनंत चतुर्थी हा एक दिवस आहे. अनंत चतुर्थी ते दुसऱ्या दिवशी मिरवणुका संपेपर्यंत अशी ड्राय डेची ऑर्डर आहे. दोन दिवस पूर्णवेळ बंदी आहे. मात्र अध्ये-मध्ये काही नियम वेळेचे बनवले आहेत. पूर्ण 10 दिवस ड्राय डे हे नरेटिव्ह आहे, तसे आदेश नाहीत, असं सरकारी वकिलांनी सांगितलं. तर, पुणे हा सुशिक्षित आणि सुजाण लोकांचा जिल्हा आहे. पुढारलेला आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व दिवस ड्राय डे करावा लागतो, असं आश्चर्य कोर्टाने व्यक्त केलं. त्यावर, आम्ही आमच्या आदेशात उद्या सुधारणा करू. गणेश चतुर्थी आणि विसर्जनाचा दिवस हे दोनच दिवस ड्राय डे आहेत. बाकी ठिकाणी वेळेचे निर्बंध ठेवले आहेत, असं सरकारी वकिलाने सांगितलं.

पुण्यात दोन दिवसच ड्राय डे असून शेवटच्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत तुम्ही बंदी ठेवू शकता असे सुचवले. 14 तारखेला संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच ड्राय डे ठेवा. गणेश आगमन झाल्यावर दुकाने उघडी ठेवली जाऊ शकतात, असंही कोर्टाने सांगितलं.

Follow Us
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण