Weather Alert | राज्यात पुढील पाच दिवसांत गडगडाटासह पाऊस; ग्रामीण भागासह शहरांत मुसळधारेचा अंदाज

| Updated on: Sep 24, 2021 | 3:06 PM

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.त्याची तीव्रता येत्या 24 तासांत आणखी वाढणार आहे. तसेच हे क्षेत्र पुढील 48 तासांत ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

Weather Alert | राज्यात पुढील पाच दिवसांत गडगडाटासह पाऊस; ग्रामीण भागासह शहरांत मुसळधारेचा अंदाज
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. सप्टेंबर संपत असताना पाऊस संपूर्ण राज्यात धुमशान घालणार आहे. हवामान खात्याने याबाबत नवीन अपडेट जारी केला असून पुढील चार ते पाच दिवसांत सर्वत्र गडगडाटासहीत पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Rain with thunderstorms over the next five days in the state, flood forecast in cities including rural areas)

हवामान खात्याने काय म्हटले आहे?

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.त्याची तीव्रता येत्या 24 तासांत आणखी वाढणार आहे. तसेच हे क्षेत्र पुढील 48 तासांत ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा अंदाज वर्तवून सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने गेल्या आठवड्यात म्हटले होते की,’सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 20 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. विदर्भात जोरदार पाऊस होईल. त्यानंतर हा पाऊस राज्याच्या उत्तरेकडील बहुतेक भागाला व्यापून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करेल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार सध्या विदर्भात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. पावसाने नागपूरला सर्वाधिक तडाखा दिला आहे. त्यात आता पुढील चार ते पाच दिवसांत पासचा जोर आणखी वाढू शकेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचीही धास्ती वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील प्रशासन सतर्क राहिले आहे.

परतीच्या पावसाला विलंब

चालू वर्षी परतीचा पाऊस लांबणार असल्याचे हवामान खात्याने याआधीच सांगितले आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. खरिपातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याचवेळी पावसाने नुकसान करू नये, अशी प्रार्थना राज्यातील नागरिक करीत आहेत. यंदा कोकणसह सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला होता. त्यामुळे पावसाच्या जोरदार हजेरीमुळे धडकी भरत आहे. गेल्या आठवड्यात मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाची हजेरी लागली होती. त्यामुळेही शहरी भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते. (Rain with thunderstorms over the next five days in the state, flood forecast in cities including rural areas)

इतर बातम्या

‘त्या’ नराधमांना फाशी देऊ नका, त्यांचा लिंगच्छेद करून गावागावातून मिरवणूक काढा; रिपाइं महिला कार्यकर्त्या संतापल्या

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करा, जयंत पाटलांचे आदेश