
दोन्ही ठाकरे आज एकाच मंचावर आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आनंदाचे भरते आले आहे. राज्यातील राजकारणातून सत्ताकारणाचे वेध दोन्ही पक्षांना लागले आहे. अर्थात त्यासाठी मोठी मजल दर मजल करावी लागणारच. पण सध्या पहिली पायरी दोन्ही पक्ष चढले आहेत. त्यांना अजून मंदिराचा व्हरांडा गाठायचे असल्याची प्रतिक्रिया राज्यातून येत आहे. त्यातच छगन भुजबळ यांनी ठाकरे बंधूंना एक सवाल केला आहे. मेळाव्याला शुभेच्छा देत त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. काय आहे तो सवाल?
दोघे एकत्र येणे हे स्वाभाविक
दोघे एकत्र येणे हे स्वाभाविक आहे. मूळ शिवसेना मराठी मुद्द्यावर जन्माला आली. याच मुद्द्यावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत. दोन भवानी एकत्र यावे अशी लोकांची इच्छा आहे, असे भुजबळ म्हणाले.
आम्हाला सुध्दा असे वाटत की ते एकत्र यावे पण अस होणार आहे का? राज ठाकरे का दूर गेले ते करण सुटले का संपले का. एका कार्यक्रमासाठी ते एकत्र आले आहेत. निवडणुकांसाठी ते एकत्र येथील का नाही याची मला काही कल्पना नाही एकत्र येणे शक्य आहे का ते येणारा वेळ सांगेल. आता दोघांनी सांगितले आहे. आम्ही आमच्या भांडण पेक्षा मराठी मुद्दा जास्त महत्वाचं आहे.
मनापासून एकत्रीत येणं हे वेगळं आहे, ज्या मुद्यावर ते वेगळे झाले ते प्रश्न सुटले का? कदाचित पुढे जाऊन ते प्रश्न सुटतील देखील. सभा आणि रॅली पुरता ते एकत्र आले आहेत पण त्यांचे मनोमिलन झाले पाहिजे ही लोकांची इच्छा आहे. लोकांची इच्छा आहे ते एकत्र आले पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
केडीयांच्या भूमिकेवर नाराजी
मराठी माणूस ज्या राज्यात गेले आहेत त्याठिकाणी ते त्या राज्याचे भाषा बोलतात. मराठी बोलणारच नाही हे काही बरोबर नाही, असे मत भुजबळ यांनी केडिया यांच्या भूमिकेवर मांडले. जे मंडळी मराठी बोलणार नाहीत असे सांगतात ते परदेशी गेल्यावर इंग्रजी बोलतात, असा टोला त्यांनी लगावला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र देखील म्हणाले. गुजराती समाजाचा कार्यक्रम होता आणि वातावरण देखील होत त्यामुळे ते म्हणाले असतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.