Raj Thackeray: जंतर मंतरवर डोकी फोडली, माफी कधी मागणार? राज ठाकरे यांचा रोख कुणावर?

Raj Thackeray on Amit Shah: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी CJP आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा उल्लेख करत आतापर्यंत याविषयावर माफी का मागण्यात आली नाही असा सवाल केला. लाठी हल्ला करण्याचे आदेश देणारे कधी माफी मागणार असा सवाल त्यांनी केला.

Raj Thackeray: जंतर मंतरवर डोकी फोडली, माफी कधी मागणार? राज ठाकरे यांचा रोख कुणावर?
राज ठाकरे, अमित शाह
| Updated on: Aug 01, 2026 | 1:10 PM

मनविसेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी CJP आंदोलनावर भाष्य केले. 20 जुलै रोजी जंतरमंतरवरील आंदोलकांवर लाठीहल्ला झाला होता. पेलेट गनचा वापर झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला होता. तर पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप झाला होता. या विषयाला हात घालत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. मोदी म्हणतात त्या मुलांना माफ केलं. पण १२ वर्ष तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार. जंतरमंतरवर डोकी फोडली. त्याचे आदेश देणारे कधी माफी मागणार, असा सवाल त्यांनी केला.

सध्याच्या परिस्थितीवर परखड मत

हा विषय कुणाला सत्तेवर खेचणं आणि कुणाला तरी सत्तेवर आणणं एवढा विषय नाही. हा देशाचा विषय आहे. देशाच्या भविष्याचा विषय आहे. तरुणांचा विषय आहे. काय होणार आहे त्यांचं. देशाच्या ग्रामीण भागातील तरुण तरुणी काय करत असतील. काय विचार करत असेल. माझ्या बाजूच्या घरातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या अंत्यविधीला जाणार. विचार काय करणार माझ्या वडिलांनी करू नये. मी शहरात गेलं पाहिजे. नोकरी केली पाहिजे. पण नोकरी कुठून मिळणार. कुठे राहणार. आज शहराची परिस्थिती बघा. स्मार्ट सिटी करणार होते. कुठे आहे. रस्ते पूल याला आपण विकास म्हणतोय. आपली शहरी राहण्यायोग्य आहे का इथून सुरूवात आहे, असे परखड भाष्य राज ठाकरे यांनी केले.

मुलं परदेशात का जात आहेत?

मुलं परदेशात का जात आहेत. कारण सभोवतालचं वातावरण. घरातून बाहेर पडल्यावर आनंद मिळाला पाहिजे. बागा सुंदर आहे. फुटपाथ चांगल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला वाव आहे, असं वातावरण आहे. चित्रकार आणि खेळाडू ग्रामीण भागात आहेत. वावच नाही. काय करायचं पुढे माहीत नाही. कुणाला भेटायचं माहीत नाही. हे साचलेलं बाहेर येत आहे. नीटचा राग आहे. पण हे जे साचून ठेवलंय. त्याचं काय करणार आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी या मेळाव्यातून विचारला.

एकाच उद्योगपतीवर मेहरबानी

मला वाटतं मूळ हे का झालं. नीटची परीक्षा हे कारण आहेच. हे प्रत्येक ठिकाणी जो काही रिस्पॉन्स मिळाला. विद्यार्थी सर्व नव्हते. तरुण होते. तरुणी होत्या. ते का आले रस्त्यावर. याचं कारण सभोवतालचं वातावरण. नीटचे परीक्षेचे पेपर फुटलं हे कारण होतं. रौद्र रुप धारण केलं ते अजूबाजूचं साचलेलं आहे. आमच्याकडे बागा नाही, पाणी साचलेलं असतं. मुलांना खेळायला मैदान नाही. बाहेर कुठे जाता येत नाही. शिक्षण झालं, नोकऱ्या नाही. कंपन्या खासगी लोकांना दिलं जात आहे. एकाच उद्योगपतीवर मेहरबानी सुरू आहे. देशात फक्त निवडणुका सुरू आहे. आमदार खासदार फोडले जात आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us