राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय? म्हणाले, 2029 मध्ये…

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, तुम्हाला तरी त्याची अपेक्षा होती का?' असा सवाल करत राज ठाकरे मुख्यमंत्री होण्याबाबत अमित ठाकरेंनी गणपतीला साकडे घातले तर त्यात चूक काय? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय? म्हणाले, 2029 मध्ये...
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 10:44 AM

राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं अमित ठाकरे यांनी पुण्यात गणपतीला घातलं आहे. त्यामुळे राज ठाकरे मुख्यमंत्री होणार का? यावरून राज्यात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी विधानसभेत सदस्यांचा आकडा लागतो, अशी टीका भाजपने केली आहे. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे तुम्हाला तरी वाटलं होतं का? पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. राज ठाकरे मुख्यमंत्री होण्याबाबत अमित ठाकरे यांनी अपेक्षा बाळगली तर चूक काय? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून गणपतीला साकडे घालणं यात चुकीचं काय आहे? उलट अमित ठाकरे यांनी तसं साकडं घातल्याने आनंद आहे. आता त्यानुसार त्यांना पक्षाची बांधणी आणि दिशा ठरवावी लागेल. अमित ठाकरे यांना त्यांना त्यापद्धतीने पुढे जावं लागेल. मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा बाळगणं यात चुकीचं काय आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी उत्तम काम केलं. कटकारस्थान करून त्यांना बाजूला करण्यात आलं. कोणत्याही परिस्थितीत ठाकरेंचा घोडा अडवायचा हे एकमेव काम भाजप आणि मिंधे गटाकडून सुरू आहे. पण हा घोडा असा अडवला जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

बहुमत चंचल असतं…

राज ठाकरे का मुख्यमंत्री होऊ शकत नाही? 2029मध्ये आम्ही एकत्र आहोत. आम्ही बसू. चर्चा करू. उद्धव ठाकर मुख्यमंत्री होतील हे तुम्हाला तरी वाटलं होतं का? तुमच्या डोक्यात तरी होतं का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, हे फक्त मीच सांगत होतो. राजकारण असंच असतं. बहुमत फार चंचल असतं. त्यासारखी दुसरी चंचल गोष्ट काही नाही. आज मोदींकडे बहुमत आहे. 72 तासात ते जाऊ शकतं. बहुमत इतकं चंचल असतं, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

ही तर ब्लॅक कॉमेडी

फडणवीस सरकारमधील काही मंत्री, आमदार काजू, बादाम खाताना दिसले. काही जण सोशल मीडियावर असल्याचं पाहायाला मिळालं. त्यावरूनही राऊत यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. लोकप्रतिनिधींना कसलंही गांभीर्य नाही. फडणवीस यांच्या सरकारमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही ब्लॅक कॉमेडी सुरू आहे. कुणाला गांभीर्यच नाही. शेतकरी मरत आहेत. त्यांना काही पडलं नाही. यांच्या राज्यात विध्वंस सुरू आहे. काही ठिकाणी कॉमेडीच कॉमेडी सुरू आहे. त्यांनी ते पाहिलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

मदत आज हवी

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आताच आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे. तुमच्या अहवालाच्या ओझ्याखाली शेतकरी मरून जाईल. तुम्ही पंचनामा कराल, मग मंत्रिमंडळाची बैठक घ्याल, मग केंद्राचं पथक येईल, ते पाहणी करतील. मग तुम्ही परत बैठक घ्याल. त्यानंतर अहवाल तयार होईल. अहवाला केंद्राला पाठवला जाईल आणि मग कधी तरी मदत होईल. तोपर्यंत शेतकरी मरून जाईल. शेतकऱ्यांना आज मदत हवी आहे. अहवालासाठी तुम्हाला तिथे बसवलं नाही. आम्हाला आज मदत हवी आहे, असं राऊत म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us