AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी लोकांना मारहाण, धक्काबुक्की… मुंबईतील कबुतरखाना वाद पेटला, राज ठाकरे संतापले, म्हणाले जैन मुनी…!

मुंबईतील कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्न देण्यावर बंदी घातल्यानंतरही असे करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जैन मुनींसह सर्वानीच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे असेही ते म्हणाले.

मराठी लोकांना मारहाण, धक्काबुक्की... मुंबईतील कबुतरखाना वाद पेटला, राज ठाकरे संतापले, म्हणाले जैन मुनी...!
raj thackeray kabutarkhana 1
| Updated on: Aug 14, 2025 | 12:31 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कबुतरखान्याचा वाद सुरु आहे. दादर कबुतरखान्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली. कबुतरखान्यासंबंधी जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. कबुतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. याबद्दलची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कबुतरखान्याच्या बंदीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. मुंबई हायकोर्टाने सांगितल्यावरही जर कबुतरांना खायला घालत असतील तर त्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

जैन मुनींनी विचार करणे गरजेचे

वरळीतील लोक स्वतच्या घरात जातात ही खूप चांगली गोष्ट आहे. स्वतच्या मोठ्या घरात तेही मुंबईत जाणं ही फार चांगली गोष्ट आहे. कबुतरखान्याबद्दल दोन विषय आहेत. एक म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे. त्यामुळे त्याप्रमाणे सर्वांना वागावं लागेल. त्याप्रमाणे जैन मुनींनी हा विचार करणं गरजेचे आहे. हायकोर्टाने जर कोणत्याही गोष्टीवर बंदी घातली आहे, तर त्याप्रकारे ते करायला हवं, असं मला वाटतं, असे राज ठाकरे म्हणाले.

हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कशाला म्हणायचे?

दुसरं म्हणजे कबुतरांमुळे कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात, हे आतापर्यंत अनेक डॉक्टरांनी सांगितलेले आहे. त्यांना खायला घालू नये असं हायकोर्टाने सांगितल्यावरही जर त्यांना खायला घालत असतील तर त्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचे आहे. हायकोर्टाचा निर्णय जर त्यांना खायला घालू नका असा आहे, तर मग धर्म धर्म या नावाखाली जर तुम्ही त्यांना खायला घालत असाल तर मग ते अत्यंत चुकीचं आहे. कारण जर या गोष्टी एकदा सुरु झाल्या तर लगेचच बाकीच्या गोष्टी सुरु होतात. मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कशाला म्हणायचे? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे

यासाठी जैन लोकांकडूनही आंदोलन झाले. तसेच मराठी लोकांकडूनही आंदोलन झाले. ज्यावेळी त्यांच्याकडून आंदोलन झालं तेव्हा पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. ती झाली नाही. यात जे लोढा वैगरेसारखे जे माणसं मध्ये येतात. ते मंत्री आहेत, कोणत्याही समाजाचे मंत्री नाही. त्यांनी महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे. त्यांनी जे काही चाकू सुऱ्या आणल्या असतील, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला हवी. काल जे काही मराठी लोक गेली होती. त्यांना धक्काबुक्की झाली. पत्रकारालाही मारहाण झाली, हा नक्की काय प्रकार सुरु आहे, मला काहीही समजत नाही. सरकारला नक्की हवंय काय, फक्त निवडणुकीसाठी सर्व समाजांमध्ये त्यांनी एक एक विषय सुरु केलेत. आधी हिंदी आणून पाहिलं, आता कबुतर आणली आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?