AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंसाठी उत्तर भारतीयांचे 5 कडवे सवाल!

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच उत्तर भारतीय मेळाव्यात दिसणार आहेत. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचाय संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील कांदिवली इथे येत्या 2 डिसेंबर रोजी बुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. परप्रांतियांच्या मुद्द्यावरुन नेहमीच आक्रमक होणारे राज ठाकरे हे थेट उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला जाणार असल्याने, देशभरात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे […]

राज ठाकरेंसाठी उत्तर भारतीयांचे 5 कडवे सवाल!
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच उत्तर भारतीय मेळाव्यात दिसणार आहेत. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचाय संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील कांदिवली इथे येत्या 2 डिसेंबर रोजी बुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. परप्रांतियांच्या मुद्द्यावरुन नेहमीच आक्रमक होणारे राज ठाकरे हे थेट उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला जाणार असल्याने, देशभरात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागताची तयारीही उत्तर भारतीय महापंचायीने केली आहे. राज ठाकरे हे उद्याच्या मेळाव्यात काय बोलणार याबाबत देशभरात उत्सुकता आहेच, मात्र उत्तर भारतीयांमध्ये ती उत्सुकता जास्त दिसून येते.

उत्तर भारतीयांना राज ठाकरेंबद्दल काय वाटतं? त्यांनी कोणत्या मुद्द्यावर बोलावं? कोणत्या प्रश्नांना उत्तरं द्यावी? याबाबत उत्तर भारतीय महापंचायतीने थेट यूपीच्या नागरिकांकडून काही प्रश्न मागवले. राज ठाकरेंसाठी प्रश्न म्हटल्यावर अनेकांनी प्रश्नांचा भडीमार केला. राज ठाकरेंना आलेल्या असंख्य प्रश्नांमध्ये पाच प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. ते पाच प्रश्न कोणते?  –

राज ठाकरेंना उत्तर भारतीयांचे पाच प्रश्न 

1) काहीही झालं तर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला मारण्या-झोडण्याचे आदेश का देता? मनसेकडून आम्हाला नेहमी मारहाण का होते?

2)महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा तुम्ही स्वत:ला संविधानापेक्षा मोठं समजता का? संविधानानुसार देशातला प्रत्येक नागरिक कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो, नोकरी, व्यवसाय करु शकतो, तर मग मनसेला संविधानापासून, कायद्यापासून त्रास आहे का?

3) कल्याणमध्ये रेल्वे भरतीला आलेल्या विद्यार्थ्यांना एवढ्या बेदमपणे मारहाण का करण्यात आली? आमच्या विद्यार्थ्यांना का मारलं?

4) फेरीवाले महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हप्ते देऊन आपली दुकानं लावतात, मग मनसे कायम फेरीवाल्यांवरच हात उचलते. तसं कधी BMC च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कधीच काही करत नाही. फक्त फेरीवाल्यांनाच मारहाण का ?

5) उत्तर भारतीय माणूस 8 ते 10 हजारात 12 – 12 तास पडेल ते काम करतो, कष्ट करतो, दिवसभर काम करुनही रात्रपाळीही करतो. तसं तुमचा मराठी माणूस असं काम करेल का? साफसफाईची किंवा वॉचमन म्हणून काम करेल का ?

2 डिसेंबरला मेळावा

राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचाय संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील कांदिवली इथे येत्या 2 डिसेंबर रोजी बुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांना दोन महिन्यापूर्वीच निमंत्रण दिलं होतं, ते त्यांनी स्वीकारलं. उत्तर भारतीयांवर नेहमीच सडकून टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आधी माफी मागा, मग उत्तर भारतीयांच्या मंचावर जा : निरुपम

ज्यांनी उत्तर भारतीयांना त्रास दिला, ज्यांना मारहाण केली, ते आता उत्तर भारतीयांच्या मंचावर जायचा प्रयत्न करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी  त्यानंतर मंचावर जावं, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.

गैरसमज पसरवण्यासाठी आमचेच नेते कारणीभूत : विनय दुबे

“अनेक उत्तर भारतीय हे ग्राऊंड लेव्हलचे आहेत. मनसेची बाजू त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. त्यामुळे राज ठाकरे आमच्या मंचावर आल्याने अनेक उत्तर भारतीयांना त्यांची उत्तरं मिळतील. अनेक गोष्टी ग्राऊंडच्या उत्तर भारतीयांपर्यंत गाळून येते, त्यामुळे अनेक गैरसमाज निर्माण होतात. हे गैरसमज पसरवण्यासाठी आमचे अनेक नेतेही कारणीभूत आहेत. राज ठाकरे यांच्याशी सरळ संवाद साधल्याने उत्तर भारतीयांच्या मनातील अनेक शंका दूर होतील.”, असा विश्वास उत्तर भारतीय पंचायत महासभेचे अध्यक्ष विनय दुबे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार!   

राज ठाकरे आधी माफी मागा, मग मंचावर जा: निरुपम   

राज ठाकरेंबाबत आमचेच नेते गैरसमज पसरवतात : दुबे   

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.