AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे आधी माफी मागा, मग मंचावर जा: निरुपम

मुंबई : ज्यांनी उत्तर भारतीयांना त्रास दिला, ज्यांना मारहाण केली, ते आता उत्तर भारतीयांच्या मंचावर जायचा प्रयत्न करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी  त्यानंतर मंचावर जावं, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी […]

राज ठाकरे आधी माफी मागा, मग मंचावर जा: निरुपम
| Updated on: Nov 12, 2018 | 2:06 PM
Share

मुंबई : ज्यांनी उत्तर भारतीयांना त्रास दिला, ज्यांना मारहाण केली, ते आता उत्तर भारतीयांच्या मंचावर जायचा प्रयत्न करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी  त्यानंतर मंचावर जावं, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. राज ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे. परप्रांतियांच्या मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीय मंचावर दिसणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातूनच संजय निरुपम यांनी आता राज ठाकरे यांनी मंचावर जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

मुंबईतील कांदिवली इथे येत्या 2 डिसेंबर रोजी बुराभाई हॉलमध्ये उत्तर भारतीय महापंचायत संघाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना 12 ऑक्टोबर रोजी आमंत्रण दिलं होतं, जे त्यांनी स्वीकारलं. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. तसंच उत्तर भारतीयांसदर्भातील मत व्यक्त करणार आहेत.

परप्रांतातून मुंबईत येणारे लोंढे असो किंवा फेरीवाल्यांचा प्रश्न असो, मनसेने याविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उत्तर भारतीयांवर नेहमीच सडकून टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वीही राज ठाकरे यांनी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधलेला आहे. उत्तर भारतीयांची मतं हा मुंबईत नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. त्यामुळेच आता निवडणूक तोंडावर असताना राज ठाकरे आपली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उभा राहिला आहे.

संबंधित बातमी 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार! 

Follow Us
मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्ह
मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्ह.
धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम
धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम.
भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात सदावर्तेची मुलगी मैदानात
भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात सदावर्तेची मुलगी मैदानात.
नको ती मागणी अन्... नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद? २०२४ पासून
नको ती मागणी अन्... नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद? २०२४ पासून.
जय पवारांकडून स्वत:च्याच उमेदवारीचे संकेत
जय पवारांकडून स्वत:च्याच उमेदवारीचे संकेत.
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.