AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मनसेचा डिसेंबरमध्ये नवी मुंबईत मेळावा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डिसेंबरमध्ये नवीमुंबईत मेळावा घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दिवाळी नंतर राज ठाकरे काय राजकीय फटाके फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Raj Thackeray to hold mega-rally in Navi Mumbai on december)

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मनसेचा डिसेंबरमध्ये नवी मुंबईत मेळावा
| Updated on: Nov 09, 2020 | 2:33 PM
Share

मुंबई: ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आता राजकीय पक्षांनीही मरगळ झटकून कामाला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डिसेंबरमध्ये नवीमुंबईत मेळावा घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दिवाळी नंतर राज ठाकरे काय राजकीय फटाके फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Raj Thackeray to hold mega-rally in Navi Mumbai)

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जोरदार इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. आज नवी मुंबईतील शेकडो कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी डिसेंबरमध्ये नवीमुंबईत मेळावे घेणार असल्याचं सांगितलं. तसेच नवी मुंबईतील या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी यांनी मनसेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी शिवडी आणि वरळीतील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरला होता. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी फायदेशीर मानली जात आहे. त्यानंतर आता नवी मुंबईतील विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर मनसेत दाखल झाल्याने नवी मुंबईतील मनसेची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, राज्यात काँग्रेसने शेतकरी विरोधी आंदोलने घेण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपने विविध मुद्द्यावरून राज्यात धरणे, मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावाही घेतला. शिवाय अनेक सामाजिक संघटनांकडूनही मोर्चे आणि परिषदा घेणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनेही मेळावा घेण्याचं घोषित केल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर राज ठाकरे काय भाष्य करणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, जिओ कंपनीच्या आक्रमक धोरणामुळे धंदा धोक्यात आल्याचे गाऱ्हाणे घेऊन मुंबईतील केबलचालकही राज यांना आज भेटले. जिओ कंपनीकडून विनापरवाना कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी झाडे, रस्ते आणि वीजेच्या खांबांवरुनही केबल टाकल्या जात आहेत. जिओ कंपनीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी इन मुंबई, हॅथवे, डीजे आणि सिटी केबल या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मात्र, जिओच्या प्रचंड रेट्यामुळे आमचा व्यवसाय धोक्यात आल्याचे गाऱ्हाणे केबलचालकांनी राज यांच्याकडे मांडले.

संबंधित बातम्या:

मनसेत जोरदार इनकमिंग; नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा कृष्णकुंजवर होणार पक्षप्रवेश

जिओ कंपनीमुळे आमचा धंदा धोक्यात; मुंबईतील केबलचालक गाऱ्हाणे मांडण्यासाठी ‘राज’दरबारी

BREAKING | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन, अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त

(Raj Thackeray to hold mega-rally in Navi Mumbai)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...