AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: कुर्रर्रर्र…राज ठाकरेंच्या नातवाचं बारसं; जाणून घ्या नाव अन् त्यामागील अर्थ

नामकरण सोहळ्याला फक्त घरातीलच मोजके पाहुणे उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त शिवतीर्थ फुलांनी सजवण्यात आला. राज ठाकरे यांच्या नातवाचं (Raj Thackeray's Grandson) नाव काय असेल यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावरही यावरून बरेच पोस्ट व्हायरल झाले होते.

Raj Thackeray: कुर्रर्रर्र...राज ठाकरेंच्या नातवाचं बारसं; जाणून घ्या नाव अन् त्यामागील अर्थ
Raj Thackeray with grandsonImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 3:06 PM
Share

शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा (Raj Thackeray Grandson) नामकरण सोहळा पार पडला. 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आज (शुक्रवार) पार पडलेल्या नामकरण सोहळ्यात राज यांच्या नातवाचं नाव ‘किआन’ (Kiaan) असं ठेवण्यात आलं. या सोहळ्यानिमित्त शिवतीर्थ फुलांनी सजवण्यात आला. अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता. तर जवळपास वर्षभराने म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते. काही दिवसांपूर्वीच अमित यांनी बाळाचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.

किआन नावाचा अर्थ काय?

राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असेल यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावरही यावरून बरेच पोस्ट व्हायरल झाले होते. अखेर नातवाचं नाव समोर आलं आहे. किआन या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God) असं असून हे भगवान विष्णूचं दुसरं नाव मानलं जातं. या नावाचा आणखी एक अर्थ प्राचीन किंवा राजेशाही असाही होतो.

अमित आणि मिताली हे कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. लग्नाआधी जवळपास दहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते. अमित ठाकरे पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होते. तर मिताली रुईया महाविद्यालयात कला शाखेत शिकत होत्या. त्यातच मिताली आणि उर्वशी या दोघी मैत्रिणी असल्याने कृष्णकुंजवर मितालीचं सारखं येणंजाणं सुरू होतं. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनीसुद्धा होकार दिला.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.