AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत कोरोनावर नियंत्रण कसे मिळवले?; राजेश टोपेंनी सांगितलं कारण; तृतीयपंथीय, एलजीबीटींसाठी विशेष लसीकरण केंद्राचे लोकार्पण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एन विभागातील विक्रोळी येथे सेंट जोसेफ शाळेमध्ये तृतीयपंथीयांसह एलजीबीटी नागरिकांसाठी विशेष कोव्हिड-19 लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोनावर नियंत्रण कसे मिळवले?; राजेश टोपेंनी सांगितलं कारण; तृतीयपंथीय, एलजीबीटींसाठी विशेष लसीकरण केंद्राचे लोकार्पण
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 8:35 PM
Share

मुंबई : बृहन्मुंबईची भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या पाहता, कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग रोखणे तसेच त्यावर नियंत्रण मिळवणे ही अत्यंत आव्हानात्मक कामगिरी होती. असे असले तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले, याचे श्रेय महानगरपालिकेच्या यंत्रणेला, उत्तम प्रशासकीय धोरणांना आणि नियोजनबद्ध कामकाजाला जाते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. (Rajesh Tope Inaugurats Special Corona Vaccination Center for Transgenders, LGBT in Mumbai)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एन विभागातील विक्रोळी (पश्चिम) येथे सेंट जोसेफ शाळेमध्ये तृतीयपंथीयांसह एलजीबीटी नागरिकांसाठी विशेष कोव्हिड-19 लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज (24 ऑगस्ट) सकाळी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हिड-19 लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवताना विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तृतीयपंथी व समलैंगिक नागरिकांसाठी (एलजीबीटी) विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे लसीकरण केंद्र संपूर्णपणे एन विभागाच्या आरोग्य विभागाकडून संचालित करण्यात येणार आहे. त्यासाठी एलजीबीटी समुदायाच्या हितासाठी कार्यरत बिगर शासकीय संस्थांचेही सहकार्य लाभत आहे. मुंबई महानगरातील तृतीयपंथी आणि एलजीबीटी नागरिकांचे कोव्हिड-19 लसीकरण पूर्ण करण्यासाठी हे केंद्र पुढील सहा महिने संचालित करण्यात येणार आहे. तृतीयपंथी नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसले तरीही त्यांचे कोव्हिड-19 लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. आज पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत 100 तृतीयपंथी नागरिकांचे कोव्हिड-19 लसीकरण करण्यात आले.

तृतीयपंथी व एलजीबीटी संबंधित क्षेत्रात कार्यरत सर्व बिगर शासकीय संस्थांना महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी सर्व तृतीयपंथी नागरिकांना विक्रोळीतील सेंट जोसेफ शाळेतील या विशेष लसीकरण केंद्रावर नेवून कोव्हिड-19 लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. या अनुषंगाने कोणतीही माहिती आवश्यक असल्यास अथवा समस्या असल्यास संबंधित नागरिकांनी व त्यांना मदत करु इच्छिणाऱ्यांनी एन विभाग वॉर्ड वॉर रुम संपर्क क्रमांक 022 – 21010201 यावर संपर्क साधावा. सदर दूरध्वनी वाहिनी 24 तास कार्यरत असते, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

लसीकरण केंद्र लोकार्पण कार्यक्रमावेळी महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटनेता राखी जाधव, एन विभाग प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे, स्थानिक नगरसेविका ज्योती हारुन खान तसेच उपायुक्त (परिमंडळ 6) देवीदास क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनावणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप, एन विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र खंदाडे, एलजीबीटी बिगर शासकीय संस्थेच्या प्रिया पाटील, सलमा खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

इतर बातम्या

Narayan Rane Arrests : राणेंना पोलीस नाशिकला कोर्टात नेणार?, बंद खोलीत फक्त पोलीस आणि राणे, नेमकं काय घडलं?

नारायण राणे असे का बोलतायत? भास्कर जाधव म्हणतात, हा तर सिद्धपुरुषानं दिलेला शाप, वाचा आणखी काय म्हणाले?

Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर

(Rajesh Tope Inaugurats Special Corona Vaccination Center for Transgenders, LGBT in Mumbai)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...