विमानतळ परिसरातील झोपडीधारकांना हक्काची घरं मिळणार?; आठवले घेणार मुख्यमंत्री आणि ज्योतिरादित्य शिंदेंची भेट
मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्यांचे एमएमआरडीएने सर्वेक्षण केले आहे. त्यात अंदाजे 80 हजार झोपड्यांची नोंद झाली असून या भागात 1 लाखा पेक्षा अधिक झोपड्या असल्याचा दावा स्थानिक जनतेने आणि रिपाइं कार्यकर्त्यांनी केला आहे.

मुंबई : विमानतळ परिसरातील झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी गृहनिर्माण भवन (म्हाडा) वांद्रे, गुलजारी लाल नंदा सभागृहात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शासकीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भूषण गगराणी (प्रधान सचिव नगर विकास) व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे, म्हाडा सचिव राजकुमार सागर, अतिरिक्त महानगर आयुक्त गोविंद राज, विश्वास गुजर उपजिल्हाधिकारी (SRA), चेतन चौधरी उपनिबंधक (SRA) , चंद्रकांत पवार सहायक निबंधक (SRA) छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ मर्यादितचे संचालक वरुन भाटिया, संग्राम पाटील सह अन्य मान्यवर उपस्थित होते. (Ramdas Athawale to meet CM Uddhav Thackeray and Jyotiraditya Scindia to get rightful houses for hut owners in airport area)
मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्यांचे एमएमआरडीएने सर्वेक्षण केले आहे. त्यात अंदाजे 80 हजार झोपड्यांची नोंद झाली असून या भागात 1 लाखा पेक्षा अधिक झोपड्या असल्याचा दावा स्थानिक जनतेने आणि रिपाइं कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानुसार विमानतळ परिसरातील झोपड्यांचा सर्वे पुन्हा करण्यात यावा, विमानतळ हा वाहतुकीशी संबंधित भाग असून त्याला एमयूटीपी (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट) अंतर्गत विकसित करण्यात यावे मुंबई महानगर विभागात (MMR) अन्यत्र लोकांचे पुनर्वसन करू नका आणि इन सीटू अंतर्गत म्हणजेच विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरच पुनर्वसन करण्यात यावे, विमानतळ हा प्रकल्प विशेष बाब वेगळ्या दृष्टीने राबवा जसा धारावी किंवा बी. आय. टी. चाळी सारखा, अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या.
रामदास आठवले यांनी इन सीटू पुनर्वसन देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री असताना घोषणा झाली असून ह्या सरकारने देखील तो निर्णय राबवला पाहिजे असे मत मांडले व यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत.
झोपडपट्टीवासीयांची पात्रता MUTP कायद्याअंतर्गत करावी
झोपडपट्टीवासीयांची पात्रता MUTP कायद्याअंतर्गत करावी, कोणालाही बेघर करू नये अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.विमानतळ परिसर पुनर्विकास काम गौतम अदानी यांच्या अदानी समूहाकडे असून विमानतळ परिसरातील झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी केंद्रीय विमान उड्डयन मंत्रालयाची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यासाठी आपण केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.
याप्रसंगी रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष सुमित वजाळे सरचिटणीस रतन अस्वारे, सचिव माघाडे, विलेपार्ले तालुका अध्यक्ष रितेश घायवट, कलिना तालुका अध्यक्ष नितीन कांबळे, कार्याध्यक्ष सागर लोखंडे, राकेश राक्षे, मतीन शेख, प्रदीप धोत्रे, संदिप साळवी, नरसू पोटे, अॅड. गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
इतर बातम्या
(Ramdas Athawale to meet CM Uddhav Thackeray and Jyotiraditya Scindia to get rightful houses for hut owners in airport area)
