AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Mumbai Morcha : आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar on Manoj Jarange Protest : 48 तास प्रवास करून अखेर मनोज जरांगे पाटील आज सकाळी मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबतच हजारो आंदोलक आझाद मैदानात उपस्थित असल्याचे दिसत आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आंदोलकांची गैरसोय होत असल्याचे म्हटले आहे.

Manoj Jarange Mumbai Morcha : आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन; रोहित पवारांचा गंभीर आरोप
Rohit Pawar And JarangeImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 29, 2025 | 11:40 AM
Share

मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील 48 तास प्रवास करून अखेर आज सकाळी मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानावर जाऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पण लाखो आंदोलक मुंबईत आल्यामुळे त्याच्या, राहण्याची, खाण्या-पिण्याची काहीच व्यवस्था सरकारकडून करण्यात आलेली नाही असा अरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?

रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल असे म्हटले आहे.

वाचा: जरांगेंच्या आंदोलनातून दु:खद बातमी! आंदोलकाचा अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं?

Rohit Pawar

पुढे ते म्हणाले, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात.

‘सरकार मोठी चूक करत आहे’

या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!

जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर पूर्णपणे ठाम आहेत. मराठा समाज हा मोठ्या संख्येने आझाद मैदानावर पोहोचला आहे. सकाळच्या वेळी मुंबईत अनेक भागात वाहतूककोडी झाल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर काही वाहाने ही रस्त्यावरच लावण्यात आली होती. यामुळे जरांगे पाटील यांनी लोकांना सांगितले की, आपली वाहने बाजूला काढा आणि मुंबईचे रस्ते रिकामे करा. पोलिसांना विचारा पार्किंग कुठे आहे, पोलिसांना सहकार्य करा.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा