राज्यपालांच्या हस्ते ‘डॉक्टरेट’ चे वाटप नाही, सामनाने दिलेले वृत्त गैरसमज निर्माण करणारे

राज्यभवनाने स्पष्टीकरण देताना, ‘राजभवन येथे राज्यपालांच्या (Governor bhagat Singh koshyari) हस्ते बोगस डॉक्टरेटचे वाटप’ या मथळ्याखाली दैनिक सामनाने प्रकाशित केलेले (दि. 21) वृत्त गैरसमज करणारे आहे. असे म्हटले आहे.

राज्यपालांच्या हस्ते 'डॉक्टरेट' चे वाटप नाही, सामनाने दिलेले वृत्त गैरसमज निर्माण करणारे
राज्यपालांकडून स्पष्टीकरण
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Mar 22, 2022 | 3:14 PM

मुंबई : सोमवारी सामना (Saamna) या वृत्तपत्राने एक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात राज्यभवनात बोगस डॉक्टरेट डिग्रीचे (Bogus Doctorate) वाटप झाल्याचा दावा सामनाने केला आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलंय. राज्यभवनाने स्पष्टीकरण देताना, ‘राजभवन येथे राज्यपालांच्या (Governor bhagat Singh koshyari) हस्ते बोगस डॉक्टरेटचे वाटप’ या मथळ्याखाली दैनिक सामनाने प्रकाशित केलेले (दि. 21) वृत्त गैरसमज करणारे आहे. राजभवनात 8 नोव्हेंबर 2021 रोजी महात्मा गांधी पीस फाउंडेशन या ओडिशातील एका संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता असे वृत्तात म्हटले आहे. मात्र त्या दिवशी राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण (से. सं) या संस्थेने केले होते. सदर संस्थेचे समादेशक मनिलाल शिंपी यांनी राज्यपालांना 25 ऑगस्ट 2021 रोजी पत्र पाठविले होते. त्यामध्ये कोविडच्या काळात प्रशासनाला आणि पोलीस विभागाला सहकार्य करणाऱ्या आर.एस.पी. युनिटचे शिक्षक, अधिकारी व समाजसेवक यांचा राज्यपालांनी सत्कार करावा अशी विनंती केली होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही विनंती मान्य करून दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता राजभवन येथे कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यास अनुमती दिली होती. आयोजकांचे विनंती पत्र आणि मा. राज्यपालांची अनुमती कळविणारे राज्यपालांच्या प्रधान सचिवांचे पत्र सोबत जोडले आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण (से. सं) ही संस्था होती हे स्पष्ट होते. या पत्रामध्ये महात्मा गांधी पीस फाउंडेशन या संस्थेचा किंवा पीएच.डी. प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचा कुठेही उल्लेख नाही. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्यपालांनी केवळ कोविड योद्ध्यांचा सन्मान केला. कुणालाही पीएच.डी. किंवा डॉक्टरेट प्रदान केली नाही. असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

सामनाचे वृत्त काय?

तसेच आयोजकांनी ऐनवेळी परवानगी नसताना महात्मा गांधी पीस फाउंडेशन या संस्थेचे नाव कार्यक्रमाच्या बॅनरवर छापले. तथापि, मा. राज्यपाल कार्यक्रमाला उपस्थित असेपर्यंत त्यांच्या हस्ते पीएच.डी. अथवा डॉक्टरेट कुणालाही देण्यात आली नाही. राज्यपालांचे सभास्थानावरून प्रस्थान झाल्यानंतर आणि त्यांच्या अनुमतीशिवाय आयोजकांनी परस्पर डॉक्टरेट प्रदान केल्या गेल्या किंवा कसे यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण या आयोजक संस्थेकडे विचारणा करण्यात येत असल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे,असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नवा संभ्रम निर्माण झाला आहे.

VIDEO | तुम्हाला दलित-मुस्लिमांची मते लागतात, पण त्यांचा नेता अन् पक्ष नको असतो; काँग्रेस-राष्ट्रवादीवर दानवेंची सडकून टीका

Mumbai | एका अधिकाऱ्यामुळे राज्याचा दीड हजार कोटीचा निधी अडला, आमदार चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट

Video | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जनाब सेना म्हणणार का? Shiv Sena नेते संजय राऊत यांचा सवाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें