AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत घरांची विक्री वाढली, कोणत्या भागांत घरे घेण्यास मुंबईकरांची पसंती?

mumbai housing demand: जानेवारी ते जुलै दरम्यान मुंबईत एकूण 84 हजार 653 घरांची विक्री झाली. यापूर्वी 2023 मध्ये या कालावधीमध्ये 72 हजार 713 घरांची विक्री झाली होती. मुंबईतील घरांच्या विक्रीचे प्रमाण 16% वाढले आहे. त्यामुळे 6,929 कोटी रुपयांची कमाई राज्य सरकारची झाली आहे.

मुंबईत घरांची विक्री वाढली, कोणत्या भागांत घरे घेण्यास मुंबईकरांची पसंती?
घरांची विक्री वाढली
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 01, 2024 | 1:37 PM
Share

mumbai housing demand: मुंबईत हक्काचे घर घेण्याचे अनेकांची स्वप्न असते. मध्यमवर्गीयांना मुंबईत घर घेणे शक्य नसल्यामुळे उपनगरांमध्ये घरे घेतली जातात. यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे. जुलैमध्ये मुंबईत १२ हजार १३३ घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात १६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षी मुंबईत एकूण १० हजार २२१ मालमत्तांची विक्री झाली होती. यंदा झालेल्या विक्रीमुळे राज्य सरकारला १०४७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यावर्षी जूनमध्ये ११ हजार ६४३ घरे विकली गेली होती. जुलैमध्ये यात काही वाढ झाली आहे. घर घेण्यासाठी ग्राहकांची पसंती पश्चिम आणि पूर्व उपनगराला मिळाली आहे. मध्य मुंबईतील घरांच्या विक्रीतही वाढ झाल्यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये विक्रीचे प्रमाण ७३ टक्के झाले आहे.

गेल्या सहा महिन्यांत अशी राहिली विक्री

सन २०२४ मध्ये मुंबईतील घरविक्री दरमहा १० ते १४ हजारांच्या दरम्यान राहिली आहे. जानेवारी महिन्यात १० हजार ९६७ घरांची विक्री झाली होती. फेब्रुवारी महिन्यात त्यात वाढ झाली. ती विक्री १२ हजार ५६ झाली. त्यानंतर मार्च महिन्यात घरांची विक्री वाढली. १४ हजार १४९ घरांची विक्री झाली होती. त्यामुळे राज्य शासनाला सर्वाधिक १ हजार १२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. एप्रिलमध्ये घरांची विक्री कमी झाली. या महिन्यात ११ हजार ६४८ तर मे मध्ये १२ हजार आणि जूनमध्ये ११ हजार ६७३ घरांची विक्री झाली होती. या वर्षी सर्वाधिक घरविक्री ही मार्चमध्ये झाली होती.

राज्य सरकारला १०४७ कोटी रुपयांचा महसूल

जूनच्या तुलनेत जुलैमध्ये घरविक्रीत काहीशी वाढ झाली आहे. जुलैमध्ये मुंबईतील १२ हजार १३३ घरांची विक्री झाली आहे. त्यातून राज्य सरकारला १०४७ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीच्या रुपाने मिळाला आहे. पावसाळ्यात घरविक्रीत काहीशी घट दिसून येते. पावसाळा संपल्यानंतर, सणासुदीचे दिवस सुरु झाल्यानंतर घरविक्रीत वाढ होते. त्यानुसार दसरा-दिवाळी दरम्यान घरविक्रीत चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांना आहे.

जानेवारी ते जुलै दरम्यान मुंबईत एकूण 84 हजार 653 घरांची विक्री झाली. यापूर्वी 2023 मध्ये या कालावधीमध्ये 72 हजार 713 घरांची विक्री झाली होती. मुंबईतील घरांच्या विक्रीचे प्रमाण 16% वाढले आहे. त्यामुळे 6,929 कोटी रुपयांची कमाई राज्य सरकारची झाली आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत