AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवतीर्थाची आठवण, स्वर्गातून बाळासाहेबांचे चलो वरळीचे आवाहन, ‘सामना’तून एल्गार

ठाकरे बंधूंचा आज ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत होणारा विजयी मेळावा मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक आहे. हिंदी लादण्याच्या प्रयत्नांविरुद्ध आणि मराठी एकजुटीसाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे. सामना अग्रलेखात या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. मराठी भाषा आणि अस्मितेचा बचाव करण्यासाठी हा मेळावा एक मोठा प्रयत्न आहे.

शिवतीर्थाची आठवण, स्वर्गातून बाळासाहेबांचे चलो वरळीचे आवाहन, 'सामना'तून एल्गार
uddhav Thackeray raj thackeray (2)
| Updated on: Jul 05, 2025 | 8:11 AM
Share

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ठाकरे बंधूंच्या विजयी मेळावा आज ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील वरळी परिसरातील डोम सभागृहात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक विजयी मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आता या मेळाव्याच्या निमित्ताने सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. मराठी भाषा आणि अस्मितेसाठी धोका बाहेरून नाही, तर आपल्याच लोकांकडून आहे, असे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून आजच्या विजयी मेळाव्याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करत मराठी माणसाला वरळीच्या दिशेने कूच करावी लागेल. महाराष्ट्र मेला नाही आणि मराठी एकजूट भंगणार नाही, हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

मराठी भाषेला, अस्मितेला धोका आहे तो आपल्याच माणसांकडून. मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात आहेत. शहा सेनेचे नेते एकनाथ शिंदे (मिंधे) यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अमित शहांसमोर मराठी बाण्याची ऐशी की तैशी करून ‘जय गुजरात’चा नारा दिला. हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. पैशांच्या ताकदीवर माणसे विकत घेण्याचा (स्वाभिमानासह) गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे. तो रोखायचा असेल तर ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करत आज वरळीच्या दिशेने मराठी माणसाला कूच करावी लागेल. महाराष्ट्र मेला नाही व मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो!, असे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.

प्रत्येक विजयी सोहळा शिवतीर्थावरच

महाराष्ट्राच्या भूमीवर, मुंबई नगरीत मराठी एकजुटीचा भव्य विजय सोहळा आज साजरा होत आहे. मराठी जीवनात सध्या विजयाचे आणि आनंदाचे क्षण तसे कमीच येतात. दिल्लीश्वरांनी लादलेले हिंदी सक्तीचे फर्मान उधळून मराठी माणसाने मराठी म्हणून विजयाचा एल्गार केला आहे. मराठी भाषेला शेपूट म्हणून हिंदी चिकटवण्याचा प्रयत्न सगळ्यांच्या एकीने हाणून पाडला. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आणि पुढारी एक झाले. त्या ऐक्यात तेजाने, शक्तीने, विचाराने उजळून दिसले ते अर्थात ‘ठाकरे’ भाऊ! उद्धव आणि राज ठाकरे हे 5 जुलैच्या हिंदी सक्तीविरोधी मोर्चात आपल्या फौजफाट्यासह एकत्र येत आहेत व त्या दिवशी मुंबईच्या रस्त्यावर अस्सल मराठी राडाच होईल या भयाने सरकारने महाराष्ट्रावर लादलेली हिंदी सक्ती रद्द करीत असल्याचे जाहीर केले. मराठी माणसे एकत्र आली की, काय चमत्कार घडतो त्याचे हे उत्तम उदाहरण. वरळीच्या भव्य सभागृहात यानिमित्ताने मराठी जनांचा विजयोत्सव साजरा होत आहे. खरे तर अशा मराठी विजयी मेळाव्यांना कोणतेही मोठे सभागृह पेलणार नाही. त्यासाठी मराठी माणसाचे हक्काचे शिवतीर्थच हवे होते. लढा संयुक्त महाराष्ट्राचा असेल, महाराष्ट्र स्थापनेचा असेल, नाहीतर शिवसेना स्थापनेचा, मराठी जनांनी आपला प्रत्येक विजयी सोहळा शिवतीर्थावरच गाजवला आणि आपल्या विराट शक्तीचे दर्शन घडवले, पण सध्याचे ‘मिंधे’-फडणवीस सरकार मराठी विजय उत्सवास सहकार्य करण्यास तयार नाही. त्यामुळे आजचा विजय सोहळा शिवतीर्थावर होऊ शकत नाही. अर्थात, तरीही मराठी माणसाच्या उत्साहाला आजच्या विजयी मेळाव्याने उधाण आलेच आहे. जणू स्वर्गातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या मराठी जनांना ‘चलो वरळी’चे आवाहन करीत आहेत, असेही सामना अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

मराठी माणसांची भक्कम एकजूट

महाराष्ट्रावर हिंदी सक्तीचा हातोडा पडला असता दिल्लीतील किती केंद्रीय मंत्र्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला? किती जणांनी निषेध केला? याचे उत्तर शून्यातच द्यावे लागेल. परिस्थिती तापली, सहन होईनाशी झाली, हाका आरोळय़ा मारूनही पाठिंब्याला कुणी धावेना असे झाले की, कोठेतरी स्फोट व्हायचाच. तो साक्षात ब्रह्मदेवालाही टाळता यायचा नाही. त्यात हा शिवरायांचा महाराष्ट्र व मराठी माणूस तर जात्याच बंडखोर. ही बंडखोर वृत्ती आणि मराठीचा अभिमान जोपर्यंत आमच्या धमन्यांत सळसळत आहे, तोपर्यंत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणात नाही. आतापर्यंत उघडपणे एकाही मंत्र्याने महाराष्ट्रात राहून ‘जय गुजरात’चा नारा दिला नव्हता. तो या शहा सेनावाल्यांनी दिला. केडिया नावाचा एक व्यापारी महाराष्ट्राला आव्हान देत त्याची टांग वर करून सांगतो, ‘‘मी महाराष्ट्रात 30 वर्षे राहतो, पण मराठी बोलणार नाही.’’ हे धाडस या लोकांत वाढले आहे. कारण अमित शहा यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट तोडली आहे. मराठी एकजूट तोडून त्यांनी शिंदेसारख्या लोकांना मांडलिक केले. पैशांच्या ताकदीवर माणसे विकत घेण्याचा (स्वाभिमानासह) गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे. तो रोखायचा असेल तर ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करत आज वरळीच्या दिशेने मराठी माणसाला कूच करावी लागेल, असे आवाहन ठाकरे गटाने केले आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.