अल्पवयीन असतानाच समीर वानखेडेंना बारचं परमीट मिळालं; मलिकांकडून वानखेडे कुटुंबाचा आणखी फर्जीवाडा उघड

| Updated on: Nov 19, 2021 | 2:42 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा आणखी एक फर्जीवाडा उघड केला आहे. समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांच्या वडिलांनी समीर यांच्या नावावर बारचं परमीट घेतलं होतं.

अल्पवयीन असतानाच समीर वानखेडेंना बारचं परमीट मिळालं; मलिकांकडून वानखेडे कुटुंबाचा आणखी फर्जीवाडा उघड
मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा भाजपचा दावा
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा आणखी एक फर्जीवाडा उघड केला आहे. समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांच्या वडिलांनी समीर यांच्या नावावर बारचं परमीट घेतलं होतं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. ज्ञानदेव वानखेडे हे 1997मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढलं होतं. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावानं हे परमीट घेण्यात आलं. त्यावेळी समीर यांचं वय होतं. 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस. बाप उत्पादन शुल्क विभागात काम करत होता. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे, असं मलिक म्हणाले. वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे हा बार आहे. या बारचं परमीट नुतनीकरणही करण्यात आलं आहे. 31 मार्च 2022पर्यंत या बारचं परमीट नुतनीकरण करण्यात आलं आहे. हे बार आणि रेस्टॉरंट आहे.

वडिलांनी पॉवर ऑफ अॅटर्नी दिली

दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वीच माझ्या नावावर बारचं परमीट घेण्यात आलं होतं. वडिलांनी मला पॉवर ऑफ अॅटर्नी दिली होती. त्यात काही बेकायदेशीर नव्हतं. तसेच आयकर भरताना मी माझ्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोतही दाखवले आहेत, असं समीर वानखेडे यांनी टाईम्स ऑफ इंडियांशी बोलताना सांगितलं.

तीन-चार दिवसात तक्रार करणार

केंद्रसरकारच्या सनदी अधिकाऱ्यांना दरवर्षी आपली संपत्ती जाहीर करावी लागते मात्र नोकरीस लागताना म्हणजे 2017 पर्यंत ही माहिती लपवली आहे. त्यानंतर माहिती दिली परंतु भाडे मिळत आहे अशी माहिती दिली आहे. चक्क दारुचा व्यवसाय समीर दाऊद वानखेडे करत आहे. जो सरकारी नियम (कलम 1964) नुसार कुठलाही केंद्रसरकारचा अधिकारी नोकरी करताना व्यवसाय करु शकत नाही. परंतु ज्याप्रकारे या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत हा फर्जीवाडा आहे. समीर वानखेडे याने दारु व्यवसाय सुरू ठेवून भाड्याने दिला आहे असे सांगणे ही माहिती जाणूनबुजून लपवली आहे आणि सरळसरळ केंद्रसरकारचे सरकारी नियम धाब्यावर बसवून पायमल्ली केली आहे. त्यामुळे त्याला नोकरीत राहण्याचा अधिकार नाही. येत्या तीन – चार दिवसात याबाबत डीईपीटो यांच्याकडे व इतर यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

वानखेडेंवर तीन आरोप

समीर दाऊद वानखेडे याच्यावर आर्यन खान प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर दलितांचे अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप आहे. आता दारुचा व्यवसाय करत असल्याची माहिती लपवल्याचा असे तीन प्रकारचे आरोप आणि पुरावे आहेत. या तिन्ही प्रकारणामुळे त्यांची नोकरी जाणार आहे हे निश्चित आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही

कायद्याने आपली जागा भाड्याने देऊ शकतो. मात्र लायसन्स हे ऑपरेटरच्या नावानेच निघतात. धंदा करण्यासाठी जागा देऊ शकता. लायसन्स तुमच्या नावावर आहे. व्यवसाय तुम्ही करताय आणि भाड्यावर दिले आहे हे सांगणे चुकीचे आहे. बिझनेस, सर्व्हीस नियमाचा दुरुपयोग झाला आहे. त्याची तक्रार करणार असल्याचे सांगतानाच सर्व तथ्य समोर ठेवतोय. चौकशी होईल. केंद्रसरकार त्याला वाचवणार नाही. जो पण कोण व्यक्ती असेल तो कायद्यापेक्षा मोठा नाही. सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहिले पाहिजे. परंतु समीर वानखेडेंनी कायद्याची पायमल्ली केली आहे. त्यावर कारवाई होईलच. परंतु एका वर्षात फक्त 2 लाख 40 हजार रुपये भाडे येत असेल तर काळा धंदा गोर्‍या लोकांचा खेळ सुरु आहे. दोन नंबरचे पैसे घेतले जात आहेत. भांडाफोड होऊ नये म्हणून भाड्याने दाखवले जात आहे. याची चौकशी झाली तर सत्य समोर येईल, असेही त्यांनी सांगितलं.

बोगस दस्तऐवजांचा खेळ समोर येईल

समीर दाऊद वानखेडे याने नाव बदलण्याचा प्रयत्न 27 एप्रिल 1993 रोजी प्रतिज्ञापत्र मुंबई मनपासमोर ठेवून केले. हे प्रतिज्ञापत्र दोन व्यक्तींनी केले आहे एक जीवन जोगल (रा. मुलुंड) आणि दुसरा अरुण चौधरी (रा. कल्याण) यांचा समावेश आहे. या दोघांनी मनपामध्ये दाऊद वानखेडे नाही तर ज्ञानदेव वानखेडे आहे असे प्रतिज्ञापत्र सादर केले.जे होऊ शकत नव्हते. परंतु त्यावेळच्या अधिकार्‍यांना मॅनेज करण्यात आले आहे. जन्मदाखल्यात एक कॉलम बनवून बाजूला ज्ञानदेव लिहिण्यात आले, त्यानंतर नवीन जन्मदाखला तयार झाला. नवीन जन्म दाखल्यावरून सेंट पॉल हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीचे नाव बदलून समीर ज्ञानदेव वानखेडे करण्यात आले आहे. फर्जीवाडा करुन मुंबई मनपाचे रेकॉर्ड बदलण्यात आले. 1995 मध्ये मुंबई कलेक्टरकडे अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी वडिलांचा जातीचा दाखला दाखवण्यात आला. त्यानंतर फर्जीवाडा करत अनुसूचित जातीचा दाखला मिळवला. त्याचा लाभ त्याने व बहिणीने घेतला. त्याच आधारावर आयआरएसची (IRS) नोकरी मिळवली. जातपडताळणी समितीसमोर हे प्रकरण गेले आहे. ज्यावेळी याची छाननी होईल. त्यावेळी हा सगळा बोगस दस्तऐवजांचा खेळ समोर येईल व नोकरी जाईल, असेही शेवटी नवाब मलिक म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

Kisan Andolan News: सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

निवडणुकीत किमत चुकवावी लागेल म्हणून कायदे मागे, उशिरा का होईना शहाणपण आलं; पवारांचा मोदी सरकारला टोला

Farm Laws Protest: शेतकऱ्यांचा विरोध कसा सुरू झाला?, जाणून घ्या थोडक्यात शेतकरी आंदोलनाचा प्रवास